ETV Bharat / state

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : मजुरांच्या व्यथा मांडताच प्रशासनाने घरी पोहचवण्याची केली व्यवस्था

शासनाने मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी विशेष बससेवा व श्रमिक रेल्वे सुरू केल्या आहेत. मात्र, मनमाडमधील कामगार वैद्यकीय चाचण्या केल्यानंतरही अडकून पडले होते. यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत ई टीव्ही भारतने "साहब खाना नहीं दिया तो भी चलेगा, मगर हमे गाव भेजने का बंदोबस्त करो" या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. ईटीव्ही भारतची बातमी प्रसिद्ध होताच, प्रशासनाने दखल घेत श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यातील अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना विशेष पासेस उपलब्ध करून मूळ गावी पाठवले आहे.

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट
author img

By

Published : Jun 1, 2020, 1:16 PM IST

मनमाड - देशभरातून कामासाठी आलेल्या परप्रांतीय मजुरांचे लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात हाल सुरू होते. शासनाने मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी विशेष बससेवा व श्रमिक रेल्वे सुरू केल्या आहेत. मजुरांच्या अडचणींसंबधी 'ईटीव्ही भारत'ची बातमी प्रसिद्ध होताच, प्रशासनाने दखल घेत श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यातील अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना विशेष पासेस उपलब्ध करून मूळ गावी पाठवले आहे.

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : मजुरांच्या व्यथा मांडताच प्रशासनाने उचलली पावले

शहरासह तालुक्यातील अनेक गावामध्ये बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील परप्रांतीय मजूर अडकलेले होते. या स्थलांतरित कामगारांच्या वैद्यकीय चाचण्या केल्यानंतरही त्यांना मूळ गावी पाठवण्यासाठी प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्था करण्यात आली नव्हती. यामुळे कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत 'ई टीव्ही भारत'ने "साहब खाना नहीं दिया तो भी चलेगा, मगर हमें गाव भेजना का बंदोबस्त करो" या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत, आज नांदगाव तालुक्यातील जवळपास ७५ परप्रांतीय मजुरांना विशेष बसद्वारे नाशिकरोड येथे रवाना करण्यात आले असून तेथून श्रमिक विशेष रेल्वेने सर्वांना बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड या राज्यांत पाठविण्यात आले आहे.

नाशिक येथून सुटणाऱ्या श्रमिक विशेष रेल्वेने पाठवण्यासाठी कामगारांना विशेष बसने रवाना करण्यात आले. आज शहरातील चांदवड रोड येथून कामगारांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना प्रवासात जेवणासाठी खाण्याचे पॅकेट देण्यात आले. शहरातील अनेक भागांत अनेक वर्षांपासून उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान येथून परप्रांतीय मजूर कामाला आलेले आहेत. कोरोना महामारी आल्यानंतर सर्वच ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले. काम हाताला नसताना काही दिवस कसेबसे काढल्यानंतर त्यांच्याजवळील पैसे व अन्नधान्य संपुष्टात आले. त्यावर शासनाकडून त्यांच्या खाण्याची व्यवस्था करण्यात आली.

महसूल विभागाला प्रसारमाध्यमांची अ‍ॅलर्जी...

मागेही महसूल विभाग व तहसील कार्यालयाच्या वतीने 200 परप्रांतीय मजुरांना विशेष बसने व त्यानंतर श्रमिक रेल्वेने त्यांच्या घरी पाठवण्यात आले. मात्र, दोन्ही वेळेस ही माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली नाही. यावेळीही असेच करण्यात आले, याबाबत पत्रकारांनी विचारले असता, नायब तहसिलदार व इतर अधिकारी यांच्या बोलण्यात तफावत आढळली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.