ETV Bharat / state

मनमाडमध्ये सोमवारपासून सम-विषम नियमानुसार दुकाने खुली; मात्र गर्दी ओसरण्याऐवजी वाढण्याची शक्यता

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता करण्यात आल्यानंतर मनमाड शहरातील बाजार पेठा आणि दुकानांसाठी आजपासून (सोमवार) सम-विषम दिवसांचा नियम लागू करण्यात आला आहे. याची माहिती मुख्याधिकारी डॉ.दिलीप मेणकर यांनी दिली.

shops start from Monday according to even-odd rules In Manmad
मनमाडमध्ये सोमवारपासून सम-विषम नियमानुसार दुकाने सुरु
author img

By

Published : Jun 15, 2020, 5:14 PM IST

मनमाड (नाशिक) : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता करण्यात आल्यानंतर मनमाड शहरातील बाजार पेठा आणि दुकानांसाठी आजपासून (सोमवार) सम-विषम दिवसांचा नियम लागू करण्यात आला आहे. याची माहिती मुख्याधिकारी डॉ.दिलीप मेणकर यांनी दिली. या नव्या नियमानुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार आहे. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे सम-विषम सुत्रानुसार बाजार पेठेतील अर्धी दुकाने सुरु तर अर्धी बंद राहणार आहेत. मात्र, असे असल्याने दुकाने कमी ग्राहक जास्त असे झाल्याने गर्दी कमी होण्याएवजी ती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दीवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने सम-विषम या नियमाचा फेरविचार करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक, दुकानदार आणि व्यावसायिकांनी केली आहे.

मनमाडमध्ये सोमवारपासून सम-विषम नियमानुसार दुकाने सुरु...

हेही वाचा... मुंबईत अखेर लोकल सेवा सुरू, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांची बसच्या गर्दीतून सुटका

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरु करण्यात आले. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यानंतर आता लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिलता करत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दुकानदार, व्यावसायिक, हातावर पोट असणाऱ्यांसोबत सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु, लॉकडाऊनमध्ये थोडीसी सुट मिळताच नागरिकांनी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केल्याचे पाहून या गर्दीवर नियत्रण मिळवण्यासाठी मनमाड शहरात आता सम-विषम फॉर्म्युल्यानुसार दुकाने सुरु ठेण्यास सुरुवात केली आहे.

या फार्मुल्यानुसार शहरातील उत्तर आणि पूर्व दिशेकडे दर्शनी बाजू असलेली दुकाने आठवड्यातून तीन दिवस, एका दिवसाआड म्हणजे सोमवार, बुधवार, शुक्रवार तर पश्चिम आणि दक्षिण दिशेकडे दर्शनी बाजू असलेली दुकाने मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी सुरु राहणार आहेत. नव्या सम-विषम फॉर्म्युल्यानुसार एक दुकान आठवड्यातून फक्त तीन दिवस ते देखील एक दिवसाआड सुरु राहणार आहे.

हेही वाचा... आली लहर केला कहर.. भूक लागली म्हणून बंदुकीचा धाक दाखवत तीन भामट्यांनी केली १० लिटर दुधाची लूट

दुकानांची संख्या कमी केल्यानंतर गर्दी कमी होण्याऐवजी ती वाढण्याची शक्यता मात्र जास्त आहे. शिवाय दुकानदार, व्यावसायिकांचे नुकसान होणार असून त्यात काम करणाऱ्या मजुरांना देखील फक्त तीन दिवसच काम मिळणार आहे. त्यामुळे सम-विषम दिवसांचा नियम ज्या उद्देशाने लागू करण्यात आलाय, तो उद्देश सफल होताना दिसणार नाही, असे बोलले जात आहे. बाजार पेठेतील गर्दी कमी करायची असेल तर दुकानांची संख्या कमी करण्याऐवजी ती जास्त केल्यास गर्दीवर नियत्रण मिळवता येईल, असे मत नागरिक आणि दुकानदारांनी व्यक्त केले आहे.

शासनाच्या आदेशानुसार कारवाई...

शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार दिवसाआड दुकाने उघडी राहणार आहेत. चारही दिशांचा वापर करून दिशानुसार दुकाने उघडे आणि बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच मागणीनुसार रविवारी सुट्टी ठेवण्यात आलेली आहे. तसेच सकाळी ९ ते ५ या वेळेत दुकाने खुली ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. नागरिक, दुकानदार यांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.