ETV Bharat / state

'त्या' नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार मारा - आमदार सरोज आहिरे

बिबट्याने एका महिन्यात नागरिकांवर पाच वेळा हल्ले केले असून यात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

leopard
बिबट्या
author img

By

Published : Jun 17, 2020, 3:39 PM IST

नाशिक - शहरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून, दुसरीकडे नरभक्षक बिबट्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. मंगळवारी (16 मे) नरभक्षक बिबट्याने पुन्हा एकदा नाशिक रोडजवळ अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीला फरफटत शेतात नेऊन तिला ठार केले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. बिबट्याने एका महिन्यात नागरिकांवर पाच वेळा हल्ले केले असून यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या नरभक्षक बिबट्याला वन विभागाने तात्काळ जेरबंद करावे, अथवा गोळ्या घालून ठार मारावे, अशी मागणी देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांनी वन मंत्री संजय राठोड यांच्याकडे केली आहे.

सरोज आहिर, आमदार

नाशिकच्या जाखोरी, चांदगिरी, एकलहरे, कालवी, सामनगांव, कोटमगावं, हिंगणवेढे, शिंदेपिंपळगाव खांब, भगूर, दोनवडे, पांढुरली, लहवीत, वंजारवाडी पळसे, चेहडी, शेवगेदारणा, बेलतगवाण, नाणेगाव, संसरी, वडनेर दुमला या परिसरात नरभक्षक बिबट्याचा वावर आहे. त्याच्या हल्ल्यात कुणाल पगारे ( वय 11 ), रुद्र शिरोळे ( 3 ), जिवाराम ठुबे (76 ), गुंजन नेहरे (3) यांचा मृत्यू झाला आहे.

leopard
नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार मारण्याची आमदार सरोज आहिरे यांची मागणी

देवळाली विधानसभा मतदारसंघात 50 बिबटे आहेत

वन विभागाच्या सर्वेक्षणानुसार नाशिक जिल्ह्यातील दारणा, गोदावरी, कदवा या नदी परिसराजवळ जवळपास 200 बिबटे आहेत. मुबलक पाणी, सहज मिळणारे भक्ष्य आणि प्रमुख म्हणजे लपण्यासाठी ऊस शेती असल्याने बिबट्यांच्या संख्येत वाढ होत आहे. यातील 50 बिबटे हे देवळाली विधानसभा मतदारसंघातील गावांच्या मळे परिसरात असून याबाबत वन विभाग उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार सरोज आहिरे यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.