ETV Bharat / state

Corporator Beaten Woman : मोकाट कुत्र्यांना जेवण दिल्यावरून शिवसेना नगरसेविकेची महिलेला मारहाण? परस्परविरोधी गुन्हा दाखल

नाशिकच्या पंचवटी हिरावाडी परिसरात राहणाऱ्या एक महिला आणि तिची मुलगी परिसरातील पाच ते सहा मोकाट कुत्र्यांना (dog bites to citizens) रोज जेवण खाऊ (Feeding dogs) घालतात. या कारणावरून शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका पुनम मोगरे आणि त्यांचे पती दिगंबर मोगरे यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने मारहाण केल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. मारहाण (ShivSena corporator beaten woman) झालेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा होता तो कॅमेरा आणि डीव्हीआर देखील त्यांनी काढून नेला. latest news from Nashik, Nashik Crime

Corporator Beaten Womanc
शिवसेना नगरसेविकेची महिलेला मारहाण
author img

By

Published : Dec 5, 2022, 12:43 PM IST

नाशिक : नाशिकच्या पंचवटी भागातील हिरावाडी रोडवरील लाटे नगर परिसरातील दोन महिला भटक्या कुत्र्यांना पोळ्या देत (Feeding dogs) होत्या. हे कुत्रे नागरिकांना चावत असल्याचा (dog bites to citizens) आरोप करीत स्थानिक नगरसेविकेने आणि तिच्या पतीसह कार्यकर्त्यांनी दोन महिलांना बेदम मारहाण (ShivSena corporator beaten woman) केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. latest news from Nashik, Nashik Crime

कुत्र्यांना जेवण देणे बंद करत नसल्याने मारहाण : अधिक माहिती अशी की, नाशिकच्या पंचवटी हिरावाडी परिसरात राहणाऱ्या एक महिला आणि तिची मुलगी परिसरातील पाच ते सहा मोकाट कुत्र्यांना रोज जेवण खाऊ घालतात. त्यामुळे ही कुत्रे याच परिसरात ठाण मांडून राहत असून येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींच्या अंगावर भुंकतात. वारंवार याबाबत या महिलांना सांगून सुद्धा त्या जेवण देणे बंद करत नव्हत्या. शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका पुनम मोगरे आणि त्यांचे पती दिगंबर मोगरे यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने मारहाण केल्याचा आरोप या महिलांनी केला आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे काढल्याचा आरोप: कुत्र्यांवरून सुरू झालेला हा वाद हाणामारीपर्यंत गेल्याने पोलिसांनी याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला आहे. मात्र मारहाण करणाऱ्या स्थानिक नगरसेविकेने या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआरही काढून नेल्याची तक्रार महिलेने केली आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणाचा तपास कसा करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

म्हणून मारहाण केली : आम्ही गेल्या अनेक वर्षापासून याच परिसरात राहतो आमच्या घराच्या बाहेर काही मोकाट कुत्र्यांना रोज जेवण देतो. ही मोकाट कुत्रे कोणाला त्रास देत नाही. मोकाट कुत्र्यांना जेवण द्या असे सरकारने देखील म्हटले आहे. मात्र या परिसरात मोगरे दाम्पत्यांची दादागिरी असून आमच्याशी वाद घालत मला व मुलीला मारहाण केली. तसेच मारहाण झालेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा होता तो कॅमेरा आणि डीव्हीआर देखील त्यांनी काढून नेला याबाबत आम्ही याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची मागणी असल्याचे पीडित महिलेने म्हटले.

मारहाण झाली नाही : या दोन महिला गेल्या अनेक दिवसापासून येथील मोकाट कुत्र्यांना जेवण देतात. त्यामुळे येथे कुत्र्यांची संख्या वाढली आहे. हे कुत्रे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांवर भुंकतात तसेच काही जणांना चावली देखील आहेत. याबाबत या महिलांना आम्ही वारंवार सांगितले; मात्र त्या आम्हाला उलट उत्तर देतात. त्या दिवशी फक्त शाब्दिक वाद झाला. कुठल्याही प्रकारची मारहाण झाली नसल्याचे माजी नगरसेविका पुनम मोगरे यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.