ETV Bharat / state

#corona effect : जूनपर्यंत शिवभोजन थाळी मिळणार फक्त पाच रुपयांत - उपासमारी

गोरगरिब जनतेची उपासमारी होऊ नये, यासाठी जून महिन्यापर्यंत शिवभोजन थाळी पाच रुपयांत मिळणार आहे. तसेच थाळीची संख्या पाच पटीने वाढविण्यात आली आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

मंत्री छगन भुजबळ
मंत्री छगन भुजबळ
author img

By

Published : Mar 29, 2020, 1:31 PM IST

Updated : Mar 29, 2020, 2:05 PM IST

नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गरीब, कष्टकरी व विद्यार्थी उपाशी राहू नये, यासाठी राज्यात दररोज सकाळी 11 ते 3 या वेळेत 1 लाख शिवभोजन थाळीचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्याचबरोबर शिवभोजन थाळीचे दर पाच रुपये करण्यात आले आहे. हे दर जून महिन्यापर्यंत असतील, असेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

बोलताना मंत्री छगन भुजबळ

कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी केली आहे. यामुळे प्रत्येकजण आहे त्या ठिकाणी अडकून बसला आहे. यामुळे राज्यातील गरीब जनता, विद्यार्थी, मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे ते कसल्याही परिस्थितीत आपला गाव गाठण्यासाठी प्रयत्न करत आहेत. म्हणून शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपटीने वाढ करण्यात आली असल्याने मंत्री भुजबळ यांनी सांगितले. शहरी भागातील शिवभोजन केंद्रासाठी प्रति थाळी 45 रुपये व ग्रामीण भागातील केंद्रासाठी प्रती थाळी 30 रुपये शासन देणार आहे. यासाठी 160 कोटींची तरतूद शासनाने केली आहे.

शिवभोजन चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून द्यावीत. तसेच भोजनालय दररोज निर्जंतुक करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. भोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्यतो पॅकिंग स्वरूपात जेवण उपलब्ध करून द्यावे. जेवण बनविण्यापूर्वी हात कमीत कमी वीस सेकंद साबणाने स्वच्छ करावे. शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतुक करून घ्यावीत. भोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुवावित. भोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा. त्याचबरोबर भोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीत-कमी तीन फूट अंतर राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ पाच रुपयांत शिवभोजन थाळी मिळणार असल्याने राज्यातील गरजू, गोरगरीब, शेतकरी, कामगार व मजूर वर्गाला शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रत्येक नागरिक पंतप्रधान, मंत्री अन् पोलीस

यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले, प्रत्येक नागरिक पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार शरद पवार, मंत्री छगन भुजबळ आणि पोलीस आहेत. यामुळे कोरोना विरोधात सर्वांनी लढा द्यावा, अडकलेल्या लोकांना सहकार्य करा, कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी योग्य ती काजळी घ्या व लोकांना काजळी घेण्यासाठी प्रोत्साहीत करा.

जीवनावश्यक वस्तुंबाबत कोणतीही तक्रार असल्यास साधा संपर्क साधण्याचे केले आवाहन

  • अनिल सोनवणे (विशेष कार्यकारी अधिकारी) - ९७६६१५८१११
  • महेंद्र पवार (विशेष कार्यकारी अधिकारी) - ७५८८०५२००३
  • महेश पैठणकर (स्वीय सहाय्यक) - ७८७५२८०९६५
  • संतोषसिंग परदेशी (खाजगी सचिव) - ९८७०३३६५६०

हेही वाचा - शहर पोलिसांचा दणका; मौजमजेसाठी फिरणाऱ्यांवर कारवाई, पहिल्याच दिवशी १३९ दुचाकी जप्त

Last Updated : Mar 29, 2020, 2:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.