नाशिक : केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वसामांन्यांसाठी आयुष्यमान भारत ही योजना राबवली जात आहे. या योजनेत रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि तीही डिजिटल सुरुवात मिळावी, तसेच सुरक्षित रहावी यासाठी नागरिकांना आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड देण्याची योजना सुरु आहे, रुग्ण आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये कागदी फाईल दिली जाते, दरवेळी तपासणीसाठी रुग्णांना फाईल सोबत बाळगावी लागते, त्याचप्रमाणे डॉक्टरांना सुद्धा मागील सर्व रिपोर्ट तपासून पहावे लागतात,या सर्व बाबींचा विचार करता शासनाकडून आता नागरिकांना आभा आरोग्य कार्ड दिले जात आहे.
आयुष्मान भारत आरोग्य कार्ड नावाने डिजिटल स्वरूपातील हेल्थ आयडी मिळणार असून, या कार्डवर नागरिकांचा वैद्यकीय इतिहास, केलेलेउपचार, चाचण्या इत्यादींची डिजिटल स्वरूपात माहिती अपलोड केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना तसेच डॉक्टरांना रुग्णाची पार्श्वभूमी म्हणजेच मागील आजार, उपचार, निदान आदि माहिती तात्काळ मिळणार आहे. तसेच त्याच्यावर उपचार करण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे.
हे आभा हेल्थ कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत.नाशिककरांनी सर्वाधिक कार्ड घेतले नाशिक मध्ये 14 लाख 68 हजार 854 नागरिक आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी असून त्यापैकी सात लाख दहा हजार 438 लाभार्थींना आभा कार्डचे वितरण झाले आहे. त्याचबरोबर धुळे जिल्ह्यात 3 लाख 25 हजार 357 लाभार्थींना कार्ड वितरण करण्यात आले आहे, तसेच ठाणे, सिंधुदुर्ग, पालघर, छत्रपती संभाजी नगरला 48 टक्के कार्डचे वितरण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
नाशिक शहरातील सर्व भागातील सेवा केंद्र व सामाजिक संस्थांकडून आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड अर्थात आभा कार्ड बनवण्याचे काम सुरू आहे. शहरात आतापर्यंत 7 लाखांवर कार्डचे वितरण करण्यात आले आहे. नागरिकांनी आपले कार्ड काढण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय किंवा आपले सरकार केंद्रावर संपर्क साधावा असे आवाहन आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ पंकज दाभाडे यांनी केले आहे.
हेही वाचा