नाशिक - ज्येष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांचे आज पहाटे गंगापूर रोड येथील राहत्या घरी निधन झाले. आज दुपारी १२ वाजता निघणार त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
यशवंत पाठक यांची येणे बोध आम्हा असो सर्व काळ, संचिताची कोजागिरी, चंदनाची पाखरं, अंगणातले आभाळ, आभाळचं अनुष्ठान, नाचू कीर्तनाच्या रंगी अशी अनेक पुस्तके झाली प्रकाशित झालेली आहे. त्यांच्या निधनाने साहित्य जगतात शोककळा पसरली आहे.