नाशिक - साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांनी मराठी साहित्य समृद्ध करण्याचा प्रयत्न केला असल्याचे मत जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले आहे. तुपे यांच्या जाण्याने मराठी साहित्याचे नुकसान झाले आहे, अशा शब्दात कांबळे यांनी तुपेंना श्रद्धांजली वाहिली. तुपे यांच्या निधनानंतर उत्तम कांबळे यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधला.
ज्येष्ठ पत्रकार कांबळे म्हणाले, उत्तम बंडू तुपे यांचा प्रवास संघर्षशील परिस्थितीतून झाला. तुपे ज्या जातीत जन्माला आले त्या मागासर्गीय जातीला इंग्रजांनी गुन्हेगार जमात म्हणून जाहीर केले होते. तेव्हा या जातीला अस्मिता, प्रतिष्ठा आणि चेहराही नव्हता. अशा परिस्थितीत तुपे यांनी लेखनाला सुरुवात केली. तुपे यांना ग्रामीण साहित्यिक म्हणून मान्यता मिळवली असली तरी त्यांनी आपल्या लेखनीतून अण्णा भाऊ साठे यांची परंपरा सांगितली आहे. 70 वर्षांनंतर त्यांनी लेखनीचा प्रवास सुरू केला.
मागासवर्गीय आणि या जातीच्या बाहेरील व्यक्तींचा संघर्ष हा विषय त्यांनी आपल्या साहित्यामधून हाताळले. मागासवर्गीय समाजातील जीवन किती कठोर असते, यावर त्यांनी 'काट्यावरची पोट' नावाचे आत्मचरित्र लिहले आणि मराठी साहित्य समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या समाजात असलेल्या अंधश्रध्दांवर भाष्य करणारी 'झुलवा' कादंबरी लिहली आणि यावर आधारित नाटक ही खूप गाजले होते. तुपे यांनी 50 पेक्षा अधिक पुस्तके लिहले. मात्र, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांच्या वैयक्तिक जीवनात संघर्षच राहिला. त्यांचा शेवटदेखील इतर साहित्यिकांप्रमाणे हलाकीत झाल्याची खंत उत्तम कांबळे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - 'कोरोना संकट हाताळण्यासाठी अतिश्रीमंतांसह बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून जास्तीचा कर घ्यावा'
अण्णा भाऊ साठे, नारायण सुर्वे, बाबुराव बागुल हे मराठीत असे तीन साहित्यक आहेत, ज्यांनी आपल्या साहित्याचे नायक आपल्या जाती बाहेरीही मोठे केले आहे. ज्यांना समाजात चेहरा नव्हता अशा भटक्या विमुक्त गुन्हेगार ठरवलेल्या जाती त्यांच्या साहित्याचे नायक झाल्या. त्याच परंपरेत जाण्याचा प्रयत्न उत्तम बंडू तुपे यांनी केला, असे उत्तम कांबळे म्हणाले.