ETV Bharat / state

ऊसतोड कामगारांच्या मुलांचा नाशकात चक्क बिबट्याच्या बछड्यासोबत सेल्फी - nashik leopard calf news

निफाड तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी जागा मिळत असल्याने या भागात बिबट्यांची संख्या मोठी आहे.

leopard
leopard
author img

By

Published : Feb 2, 2021, 4:57 PM IST

Updated : Feb 2, 2021, 7:58 PM IST

नाशिक - निफाड तालुक्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांनी जीवाची परवा न करता ऊसाच्या शेतात मिळून आलेल्या बिबट्याच्या बछड्यासोबत चक्क सेल्फी काढत हा व्हिडिओ व्हायरल केला. याचदरम्यान बिबट्याने मुलांवर हल्ला केला असता तर मोठा अनर्थ झाला असता, अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहे.

मादी जवळ असती तर...

निफाड तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी जागा मिळत असल्याने या भागात बिबट्यांची संख्या मोठी आहे. अनेकदा या भागात बिबट्यांकडून नागरिकांवर हल्ल्याच्या घटना घडत असतात. अशात कुरुडगाव शिवारात सध्या ऊसतोडणी सुरू असताना बिबट्याचे बछडे आढळले. मात्र ऊसतोड कामगारांच्या मुलांनी या 4 ते 5 महिन्याच्या बछड्याला उचलून घेत थेट जीवाची पर्वा न करता सेल्फी काढले. एवढ्यावरच न थांबता काढलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने याची चर्चा जरी होत असली, तरी यादरम्यान बिबट्याची मादी जवळ असती आणि हल्ला केला असता तर काय अनर्थ झाला असता हे सांगायला नको. त्यामुळे नागरिकांनीदेखील अतिउत्साहात जीवावर उदार होणे टाळावे, असे वनविभागाचे म्हणणे आहे.

नाशिकचे निफाड, सिन्नर, इगतपुरी बिबट्याचे हॉटस्पॉट

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, चांदवड हे तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट म्हणता येईल. या तालुक्यातून गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्या प्रवाहित होत असून या नद्यांच्या आजूबाजूला ऊसाचे मोठे क्षेत्र आहे. अशात बिबट्यांना लपण्यासाठी ऊसाचे शेत ही सुरक्षित जागा असल्याने बिबट्याच्या वावर याठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. यासोबत मुबलक पाणी आणि गावात भक्ष्य म्हणून बिबट्यांना शेळ्या-मेंढ्या तसेच भटकी कुत्री मिळत असल्याने बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

'200हून अधिक बिबटे'

वनविभागाच्या एका सर्वेक्षणानुसार नाशिक जिल्ह्यात जवळपास 200हून अधिक बिबटे असल्याचे समोर आले आहे. अनेकदा काही बिबटे भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असल्याचे दिसून आला आहे.

Last Updated : Feb 2, 2021, 7:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.