ETV Bharat / state

भेटी लागी जीवा : टाळ मृदुंगाच्या गजरात बसने संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान - संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा

राज्यातील दहा मानाच्या पालख्यांचे आज प्रस्थान होत आहे. निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे. पालखीचा प्रवास हा त्र्यंबकेश्वर ते वाखरीपर्यंत पहिला टप्पा असणार आहे. वाखरी येथे सर्व मानाच्या पालख्यांची भेट होणार आहे.

sant nivruttinath maharaj palkhi left for pandharpur by bus
संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान
author img

By

Published : Jul 19, 2021, 10:21 AM IST

Updated : Jul 19, 2021, 12:14 PM IST

नाशिक - संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने सकाळी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. पहाटेच्या सुमारास पारंपरिक पूजा विधी झाल्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत ही पालखी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. कोरोनाच्या फेऱ्यातून वाचवी जगाला, सुखी ठेव देवराया माझ्या भारत देशाला, असे म्हणत 32 वारकरी हे शिवशाही बस मधुन निवृत्तीनाथ महाराजांची पालखी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले आहेत.

प्रतिक्रिया

वाखरी येथे सर्व मानाच्या पालख्यांची भेट होणार -

राज्यातील दहा मानाच्या पालख्यांचे आज प्रस्थान होत आहे. निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे. पालखीचा प्रवास हा त्र्यंबकेश्वर ते वाखरीपर्यंत पहिला टप्पा असणार आहे. वाखरी येथे सर्व मानाच्या पालख्यांची भेट होणार आहे. तेथून सर्व पालख्या पायी पंढरपूरकडे रवाना होणार आहे. एका पालखीसोबत दोन बस शासनाने दिल्या आहेत. 32 वारकरी आणि काही शासकीय अधिकारी त्यांची आरटीपीसीआर टेस्ट होणार आहे. पौर्णिमेपर्यंत सर्व पालख्यांचा मुक्काम पंढरपूरला असणार आहे. यानंतर 24 तारखेला सर्व वारकरी परतीचा प्रवास करतील, असे निवृत्ती महाराज संस्थानचे पुजारी जयवंत गोसावी यांनी सांगितले.

sant nivruttinath maharaj palkhi left for pandharpur by bus
संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान

हेही वाचा - Ashdhi wari 2021 : संत नामदेव महाराज यांची वाखरीतील संत परंपरेची भेट

कोरोनाच्या फेऱ्यातून वाचवी जगाला, सुखी ठेव देवराया माझ्या भारत देशाला -

पायी वारी होत नाही याचा खेद वाटतो. कोरोनाचे संकट गेले पाहिजे, पुढच्या वर्षी सर्व वारकऱ्यांसंहित वारी झाली पाहिजे. कोरोनाचा फेरा अवघड आहे. कोरोनाच्या फेऱ्यातून वाचवी जगाला, सुखी ठेव देवराया माझ्या भारत देशाला, अशी साकडे पांडुरंगाला यावेळी घालण्यात आले. पालखी निघत असताना त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. 48 दिवसांचा पायी प्रवास वारकरी करत असतात. मात्र, कोरोना संकटामुळे यावेळी बसने मोजकेच वारकरी पंढरपूरला जात आहेत.

Last Updated : Jul 19, 2021, 12:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.