ETV Bharat / state

Trimbakeshwar Temple Controversy: प्रदीप कुरूलकर प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी दंगली घडविण्याचा प्रयत्न-संजय राऊत

author img

By

Published : May 17, 2023, 1:50 PM IST

Updated : May 17, 2023, 2:09 PM IST

त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये काहीही चुकीचे घडले नाही. मी याबाबत माहिती घेतली, मंदिर परिसरातून संदल मिरवणुकीतील धूप आपल्या देवांना दाखवण्याची जुनी प्रथा आहे. मंदिराच्या गेटवर आपल्या देवांना धूप दाखवून ते नागरिक पुढे गेले. मंदिरात बळजबरीने शिरण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही, कुरूलकर प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी दंगली घडविण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. संजय राऊत एका खाजगी कार्यक्रमानिमित्त नाशिकला आले असता पत्रकारांशी बोलत होते.

Trimbakeshwar Temple Controversy
संजय राऊत

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश विषयाबाबत संजय राऊत यांची प्रतिक्रिया

नाशिक : नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराचा मुद्दा सध्या तापलेला आहे. आमच्या इतके कडवट हिंदुत्ववादी या देशात कोणी नाही, आम्ही ढोंगी नाही. त्र्यंबकेश्वर हा आमचा आस्थेचा व श्रद्धेचा विषय आहे, त्र्यंबकेश्वरमध्ये कधीही अशा प्रकारच्या घटना घडल्याचे माझ्या स्मरणात नाही. मी परवाच्या घटनेची माहिती घेतली. त्यानुसार कोणीही मंदिरात बळजबरीने घुसल्याची माहिती माझ्याकडे नाही, मंदिर प्रशासनावर दबाव आणून अशा प्रकारचे पत्र त्यांना द्यायला लावल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सध्या महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या नावाने टोळ्या निर्माण करायच्या आणि वातावरण दूषित करायचा कट दिसतो आहे. - संजय राऊत

सरकारच्या पायाखालची जमीन हादरली : त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर एका धर्माच्या काही तरुणांनी धूप व फुले वाहण्याचा प्रयत्न केल्याच्या या कथित घटनेप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर बोलताना गेल्या साठ वर्षात महाराष्ट्रात राम नवमीला कधीही दंगल झाली नव्हती, पहिल्यांदाच असे घडले. राम नवमी संदर्भात आपण एसआयटी नेमली का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. सरकारच्या पायाखालची जमीन हादरली आहे. त्याचाच हा परिणाम असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण : त्र्यंबकेश्वर येथे 13 मे रोजी रात्री ही घटना घडली होती.दुसऱ्या धर्माच्या एका गटाकडून त्र्यंबकेश्वर शहरात यात्रा काढण्यात आली होती. ही यात्रा मंदिर परिसरात थांबून देवाला धुप दाखवू द्या,असा करत होती. पुरोहितांनी विरोध केल्यामुळे मंदिर परिसरात थोडा वेळ तणाव निर्माण झाला. मंदिरात हिंदुधर्मियांशिवाय कुणालाही प्रवेश नसल्यामुळे पुरोहितांनी विरोध केला. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी रविवारी शांतता समितीची बैठक बोलावली. या दोन्ही गटांना समज देऊन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गृहमंत्री एसआयटी नेमणार : त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या झाल्याच्या घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याची आदेश दिले आहेत. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही तर गेल्या वर्षीच्या घटनेची ही चौकशी करणार आहे, अशा प्रकारचे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

हेही वाचा :

  1. Trimbakeshwar temple entry row: त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसणाऱ्यांविरोधात कारवाई करा, अन्यथा राज्यातील मंदिरे दोन दिवस बंद -हिंदू महासभा
  2. Trimbakeshwar Temple Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेला प्रकार गंभीर ; देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
  3. JP Nadda Maharashtra Visit : जे.पी. नड्डा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, निवडणुकीसाठी काय आखणार रणनीती?

Last Updated : May 17, 2023, 2:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.