ETV Bharat / state

Sanjay Raut On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या आजूबाजूची माणसं नशेच्या बाजारात, आमदारांना मिळतोय लाखोंचा हप्ता - MP Sanjay Raut

Sanjay Raut On Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजूबाजूची माणसं नशेच्या बाजारात फिरत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच ड्रग प्रकणात पोलिसांना सगळ काही माहित असून नाशिकच्या आमदारांना लाखोंचे हप्ते मिळत असल्याचा दावा राऊत यांनी केलाय.

Sanjay Raut On Devendra Fadnavis
Sanjay Raut On Devendra Fadnavis
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2023, 4:02 PM IST

Updated : Oct 20, 2023, 4:23 PM IST

संजय राऊत यांची फडणवीसांवर टीका

नाशिक : ड्रग्ज प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केलाय. ठाकरे शिवसेना गटाची आज नाशिकमध्ये सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत बोलत होते. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केलीय. फडणवीस भरकटल्यासारखं बोलत आहेत. ते भांग पीत नसतील, मात्र, बहुतेक त्याच्या वासानं नशा होत असल्याचा हल्लाबोल राऊत यांनी फडणवीस यांच्यावर केलाय. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आजूबाजूचे लोक ड्रगच्या बाजारात फिरतात. त्यामुळं फडणवीसांची मती गुंग झाल्याचं टीकास्त्र राऊतांनी फडणवीसांवर सोडलंय. फडणवीस कोणत्या प्रकारचं नेक्सस उघड करणार आहे? ड्रगमुळं राज्यात एक पिढी बरबाद होत असून फडणवीस राजकारण करत आहेत, असा हल्लाबोल राऊतांनी फडणवीसांवर केलाय.

ड्रग्ज माफिया ललित पाटीलचे हप्ते विधानसभेपर्यंत पोहचत आहेत. या रॅकेटमध्ये आमदार, मंत्री, पोलीसही सामील आहे. एका आमदाराला 16 लाखांचे हप्ते मिळताय. यातील 6 आमदारांची माहिती माला पोलीस सुत्रांकडून मिळालीय. - संजय राऊत, खासदार ठाकरे गट

ड्रग्ज रॅकेटमध्ये राजकारण्याचा सहभाग : ड्रग्स माफिया ललित पाटीलचं नाशिकमधील ड्रग्ज रॅकेट उध्वस्त केल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याबाबत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधलाय. नाशिक तीर्थक्षेत्र आहे, मात्र आता नाशिकमध्ये गल्ली गल्लीत पान टपरीवर ड्रग्ज पोहचले आहेत. त्याविरोधात आम्हाला आवाज उठवावा लागेल, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. राजकीय पुढाऱ्याशिवाय नशेचा बाजार कसा सुरू आहे? ड्रग्ज रॅकेटचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे आहेत.

एका आमदाराला 16 लाखांचा हप्ता : या रॅकेटमध्ये आमदार, मंत्री सहभागी आहे. या ड्रग प्रकणातून एका आमदाराला 16 लाखांचा हप्ता मिळत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. 6 आमदारांबाबत हप्त्याची आकडेवारी पोलिसांच्या सूत्रांकडून मिळाल्याचं देखील खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे नांदगाव, मालेगाव, इंदोर, गुजरातपर्यंत आहेत. गुजरातचे धागेदोरे अफगाणिस्तानपर्यंत आहे. ठाकरे गटाच्या ड्रग विरोधी मोर्चात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊ नये, यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आदेश दिलाय. मात्र, तरी देखील विद्यार्थी, पालकांनी 'या' मोर्चात सहभागी व्हावं, असं अवाहन खासदार संजय राऊत यांनी केलंय.

हेही वाचा -

  1. Devendra Fadnavis on contract Recruitment: कंत्राटी भरतीचा जीआर रद्द-गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
  2. Sasoon Drugs Case : ड्रग्ज माफिया ललित पाटील पळून जातानाचा CCTV समोर; सीसीटीव्हीतून धक्कादायक माहिती समोर
  3. Shushma Andhare : ड्रग्स माफिया ललित पाटीलचा अनिल जयसिंघानिया केला जाईल का? सुषमा अंधारेंचा सवाल

Last Updated : Oct 20, 2023, 4:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.