ETV Bharat / state

नाशिकमध्ये कोविशिल्डच्या 13 लसीकरण केंद्रांना मंजुरी

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी सिरम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया या कंपनीने लस तयार केली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी या लसीचे 43 हजार 440 डोसेजेस उपलब्ध करून देण्यात आले आहे.

author img

By

Published : Jan 15, 2021, 7:52 AM IST

13 लसीकरण केंद्रांना मंजुरी
13 लसीकरण केंद्रांना मंजुरी

नाशिक - कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी सिरम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया या कंपनीने लस तयार केली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी या लसीचे 43 हजार 440 डोसेजेस उपलब्ध करून देण्यात आले आहे. महानगरपालिका व ग्रामीण भागातील एकूण 13 लसीकरण केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात या ठिकाणी होणार लसीकरण
लसीकरणासाठी जिल्हा रुग्णालय नाशिक, सामान्य रुग्णालय मालेगाव, उपजिल्हा रुग्णालय कळवण, उपजिल्हा रुग्णालय निफाड, उपजिल्हा रुग्णालय चांदवड, उपजिल्हा रुग्णालय येवला, इंदिरा गांधी हॉस्पिटल नाशिक, शहरी आरोग्य केंद्र नवीन बिटको नाशिक, शहरी आरोग्य केंद्र जे. डी. सी बिटको नाशिक, शहरी आरोग्य केंद्र कॅम्प मालेगांव, शहरी आरोग्य केंद्र निमा मालेगाव, शहरी आरोग्य केंद्र रमजानपुरा मालेगाव, शहरी आरोग्य केंद्र सोयगाव, मालेगाव महानगरपालिका व ग्रामीण भाग मिळुन जिल्ह्यात एकूण 13 ठिकाणी लसीकरणासाठी केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.

लसीकरण १६ जानेवारीपासून सुरू होणार
लसीकरण केंद्रांवर आवश्यक तापमान निश्चित करून व्हॅक्सीन व्हॅनच्या सहाय्याने प्राप्त झालेल्या लसी वेळेत पोहोचवण्यात येणार आहेत. ज्यामुळे कोविड महामारीच्या प्रतिबंधासाठीचा शेवटचा टप्पा असणारे लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यापूर्वी जिल्ह्यातील 16 लसीकरण केंद्रांना राज्य शासनामार्फत मंजुरी देण्यात आली होती, त्यापैकी आता १३ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे नियोजित केल्यानुसार वरील केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - राळेगणसिद्धीत आचारसंहितेची एैशीतैशी; साडी वाटप केल्याने चार जणांवर गुन्हा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.