ETV Bharat / state

सलीम कुत्ता डान्स प्रकरण; भाजपा पदाधिकारी व्यंकटेश मोरे यांची चौकशी सुरू - सलीम कुत्ता डान्स प्रकरण

Salim Kutta Dance Case: सलीम कुत्ताच्या पार्टीचे निमंत्रण भाजपाचे पदाधिकारी व्यंकटेश मोरे (BJP functionary Venkatesh More) यांनी दिल्यानेच सुधाकर बडगुजर पाटीला गेले होते, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला. त्याचबरोबर पार्टीतील कुत्ता सोबतचे मोरेचे छायाचित्रे राऊत यांनी दाखवल्यानंतर आता नाशिक पोलिसांकडून भाजपा पदाधिकारी व्यंकटेश मोरे यांच्यासह 18 साक्षीदारांची चौकशी नाशिक पोलीस करत आहे.

Salim Kutta Dance Case
व्यंकटेश मोरे यांची चौकशी सुरू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 25, 2023, 10:57 PM IST

नाशिक Salim Kutta Dance Case: आडगाव शिवारातील एका फार्म हाऊसवरील पार्टीत बडगुजर हे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता सोबत असतानाचा 2016 सालचा व्हिडिओ आमदार नितेश राणे यांनी थेट विधिमंडळात पुढे आणला. यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणी मागील शुक्रवारपासून उद्धव ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar Investigation) यांची गुन्हे शाखा चौकशी करत आहे. दरम्यान व्हिडिओ संबंधित साक्षीदारांची पोलिसांकडून पुन्हा चौकशी करण्यात आली. अशात आता बडगुजरंकडून प्रश्नांची आलेली उत्तरे आणि साक्षीदारांच्या जबाबाची तपासणी पोलीस करत आहेत. व्यंकटेश मोरे यांनी दिलेल्या जबाबानंतर पोलिसांच्या हाती काय सुगावा लागतो आणि पुढे पोलीस काय भूमिका घेतात, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

चौकशीतून आणखी खुलासे होण्याची शक्यता: सुधाकर बडगुजर यांच्यासह पार्टी मधील 19 साक्षीदारांची चौकशी करण्यात येत आहे. यात काही गोपनीय साक्षीदारांचा समावेश आहे. साक्षीदारांच्या जबाबात बरेच खुलासे समोर आले आहेत. या अनुषंगाने चौकशीत अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे, असं गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी सांगितलं आहे.

कारागृहाकडून माहिती घेतली: नाशिक पोलिसांनी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून काही माहिती मागवली आहेत. हाती लागलेल्या माहितीवरून पोलिसांकडून चौकशी आणि तपासाला गती दिली जात आहे. येरवडा कारागृहात सलीम कुत्ताचा जबाब घेण्यासाठी पथकाला रवाना करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर प्रक्रिया सुरू असल्याचं समजतं.

संजय राऊत यांचा खुलासा: व्यंकटेश मोरे नाशिकमध्ये भाजपाचा पदाधिकारी आहे. त्याने सर्वपक्षीयांसाठी पार्टी आयोजित केली असेल तर आपली परंपरा आहे जाण, बसणं चर्चा करणं. म्हणून बडगुजर गेले होते. मकाऊचा बावनकुळेंचा व्हिडीओ बडगुजर कुटुंबांनी दिला म्हणून बदगुजरांवर कारवाई? हे काही कारण होऊ शकते. बाळासाहेब ठाकरे माझे दैवत आहे. त्यांची शपथ घेऊन सांगतो की, त्या व्हिडीओचा बडगुजर यांच्याशी काहीही संबंध नाही. बडगुजर आणि शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा बुरखा कसा फाटला हे मी दाखवलं.

प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न: सलीम कुत्ता व्हिडिओ प्रकरण असो की, एसीबीची चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याचा प्रकार हा केवळ राजकीय हेतूनं प्रेरित आहे. यात काही तथ्य नाही. एमडी प्रकरणात सत्ताधाऱ्यां विरोधात काढलेले मोर्चे यामुळे आपल्याला अडकवले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.

हेही वाचा:

  1. अजित पवार यांच्या ‘त्या’ टीकेवर शरद पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले माझ्या वेळेस सर्वांनी विचार करून निर्णय घेतला
  2. तुमच्या दिव्याखालचा अंधार बघा, देव, देश आणि धर्माची चिंता सोडा; रामलल्लाच्या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरेंवर शिंदे गट-भाजपाकडून घणाघात
  3. प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्यात येणार का? संजय राऊत यांनी केलं मोठं वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.