नाशिक - गेल्या पाच दिवसांपासून नाशिकच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथील कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. निवडणुकीच्या काळातच हा संप सुरू झाल्याने विविध पक्षाचे नेते कामगारांची भेट घेत आहे. त्यामुळे हा एचएएल कामगारांचा संप चांगलाच तापला आहे. याबाबतील निवडणुकीनंतर केंद्रीय संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे, तर याच कामगारांची एक समिती देखील मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटली आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांसारख्या दत्तक बापाची नाशिकला गरज नाही, पवारांचा निशाणा
36 महिन्यांपासून एचएएल व्यवस्थापनाने वेतन वाढ दिली नाही. तर 2020 नंतर एचएएल येथील सुखोई विमान बनविण्याचा करार देखील संपणार आहे. त्यामुळे जवळपास 20 हजार कर्मचारी धास्तावले असून आता करायचे काय, असा प्रश्न कामगारांना पडला आहे. याच कामगारांची एक समिती देखील मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटली आहे. लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी कामगारांकडून केली जात आहे.
हेही वाचा- नाशकात दुषित पाण्यामुळे ८७ नागरिकांना गॅस्ट्रोची लागण; दोन वृद्धांचा मृत्यू