नाशिक Damage Grapes In Nashik : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेती पिकांनचे नुकसान झाले होते. या पावसात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला. यात द्राक्ष बागांसह टोमॅटो, कांदा, भातशेती, गहू तसेच अन्य पिके डोळ्या देखत कोलमडून पडल्याने, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी नुकसान ग्रस्त परिस्थितीचा आढावा घेत जिल्हा प्रशासनाला आठवड्याच्या आत नुकसानीचा अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. (Nashik News) मात्र नुकसानीची तीव्रता अधिक असल्याने, हा अहवाल वेळेत प्राप्त झाला नाही.
नुकसानीच्या पाहणीसाठी मंत्र्यांचे दौरे : अहवालानुसार जिल्ह्यात 13 हजार 165 गावांना अवकाळीचा तडाखा बसला (Unseasonal Rain Nashik) असून 65 हजार 849 शेतकरी बाधित झाले आहेत. राज्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. 34 हजार 952 हेक्टर क्षेत्रावरील पिके कोलमडली आहेत. नुकसानीच्या पाहणीसाठी मंत्र्यांचे दौरे ही झाले, हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी, विरोधकांनी केली. शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनाने 33 टक्क्यांवरील नुकसानीचे पंचनामे केली आहेत. यासाठी कोरडवाहू क्षेत्रासाठी 8500 रुपये, बागायती क्षेत्रासाठी 17 हजार रुपये, तर फळ पिकांसाठी 22500 रुपये हेक्टर प्रमाणे मूल्यांकन करून अंतिम अहवाल सादर केला आहे. हा अहवाल पुढील कारवाईसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.
पिकनिहाय असे आहेत नुकसान -
द्राक्ष- 14 हजार 380.44 हेक्टर
कांदा- 11 हजार 535.28 हेक्टर
भातशेती- 4 हजार 677 हेक्टर
गहू -1 हजार 111 हेक्टर
टोमॅटो -298 हेक्टर
भाजीपाला- 866 हेक्टर
असे आहेत नुकसान क्षेत्र
बागायती क्षेत्र 14523.59 हेक्टर
कोरडवाहू क्षेत्र 5 हजार 710.23 हेक्टर
बहुवार्षिक फळ पिके 14 हजार 38.21 हेक्टर
हेही वाचा -