ETV Bharat / state

नाशिक : दरोडेखोरांनी सोन्याच्या चोरीसाठी तोडला महिलेचा कान - बोट टेंभे

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील बोट-टेंभे येथे बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एकाच वेळी तीन ठिकाणी दरोडा टाकला. एका दोरोड्या दरम्यान दरोडेखोरांनी ताईबाई या महिलेला घरात घुसुन जबर मारहाण करीत तिचा कान तोडुन कानातील दोन झुबे, गळ्यातील मनचली हार पळवला.

प्रितकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Oct 2, 2019, 6:37 PM IST

नाशिक - इगतपुरी तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील बोट-टेंभे येथे बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एकाच वेळी तीन ठिकाणी दरोडा टाकला. दरम्यान दरोडेखोरांनी सोन्याच्या चोरीसाठी महिलेचा कान तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ताईबाई आडोळे, असे जखमी महिलेचे नाव आहे.

दरोडेखोरांनी ताईबाई या महिलेला घरात घुसुन जबर मारहाण करीत तिचा कान तोडुन कानातील दोन झुबे, गळ्यातील मनचली हार पळवला. तर दुसऱ्या घटनेत शेजारीच राहणारे नवनाथ आडोळे यांच्या पाकीटातील सतराशे रुपये, तिसऱ्या घटनेत शिवाजी विठ्ठल आरशेंडे यांच्या घरातील कपाटातून सोळाशे रुपये व चार तोळे वजनाचे पायातील जोडवे चोरून नेले. यातील ताईबाई आडोळे यांना जबर मारहाण केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - नाशकात बाळासाहेब सानपांच्या उमेदवारीवर टांगती तलवार, 21 नगरसेवकांचे राजीनामे

या घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक अरुधंती राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी घटनास्थळी डॉगस्कॉड आणुन पाहणी केली. तसेच गुन्हे शाखेच्या स्थानिक पथकाने महामार्गावरील पेट्रोल पंपावरील व घोटी टोलप्लाझावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत माहिती घेतली. अज्ञात आरोपींवर भादवि 394, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक अरूधंती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, सहायक पोलीस निरीक्षक अमोल खोंडेसह पोलीस पथक करीत आहे.

हेही वाचा - सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Intro:नाशिक मधील इगतपुरी तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील बोट-टेंभे येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एकाच वेळी तीन ठीकाणी दरोडा टाकला असुन दरोडेखोरांनी सोन्याच्या चोरीसाठी महिलेचा कान तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे Body:ताईबाई आडोळे महीलेच्या घरात घुसुन तीला जबर मारहाण करीत तिच्या कान तोडुन कानातील दोन झुबे, गळ्यातील मनचली हार पळवला असुन दुसऱ्या घटनेत शेजारीच राहनारे नवनाथ आडोळे यांच्या पाकीटातील सतराशे रुपये, तिसऱ्या घटनेत शिवाजी विठ्ठल आरशेंडे यांच्या घरातील कपाटातुन सोळाशे रुपये व चार तोळे वजनाचे पायातील जोडवे चोरून नेले. यातील ताईबाई आडोळे यांना गंभीर मारहान केल्याने नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.Conclusion: या घटनेची माहीती समजताच पोलीस
अधिक्षक अरुधंती राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी घटनास्थळी डॉगस्कॉड आणुन पाहणी केली. तसेच गुन्हे शाखेच्या स्थानिक पथकाने महामार्गावरील पेट्रोल पंपावरील व घोटी टोलप्लाझावरील सीसीटीव्ही फुटेज चेक करत माहीती घेतली. अज्ञात आरोपींवर भादवि 394, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस अधिक्षक अरूधंती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, सहायक पोलीस निरीक्षक अमोल खोंडेसह पोलीस पथक करीत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.