नाशिक - मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने त्याचा परिमाण भाजीपाला, किराणा सोबत फळ बाजारावर देखील झाला आहे. फळांच्या किंमती वाढल्याने यंदाच्या वर्षी फळांच्या रसासाठी नागरीकांना 5 ते 10 रुपये अधिक मोजावे लागतात आहे. मागील दोन वर्षापासून सर्वच क्षेत्रातील महागाई वाढली आहे, किराणा, इंधन, औषधे, भाजीपाला सोबत फळांच्या किमतीत झालेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. फळांच्या दरवाढीचा परिणाम ज्यूस च्या किमती वर देखील झाला आहे. आंबा, लिंबू, सफरचंद, संत्री, मोसंबी ज्यूस चे दर मागील वर्षाच्या तुलनेत पाच ते दहा रुपयांनी वाढले आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीचा परिणाम सर्वच क्षेत्रांना सोसावा लागतोय.
इंधन दरवाढीचा फटका - इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढतोय. त्यामुळे नाईलाजाने महागाईतही वाढ होते आहे. गत दोन वर्षांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने भाजीपाला सोबत किराणा, फळांचे दरही वाढलेत परिणामी फळांपासून तयार होणारे पदार्थ आणि ज्युस यांच्या किमतीही वाढल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबत, ऊसाचा रस, संत्री, आंबा, अननस, सफरचंद, मोसंबी आणि फळांच्या ज्यूसची मागणी वाढली असून दुपारच्या वेळी दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे.
दुग्धजन्य पदार्थांना मागणी - वातावरणातील बदल मुळे उन्हाळ्यात दूध संकलनात घट झाली असली तरी लस्सी, ताक,दही आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढली आहे,मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने बाजारात दुग्धजन्य पदार्थाची काही प्रमाणात टंचाई जाणवत आहे.
म्हणून वाढले दर.. - मागील दोन वर्षात सर्वात क्षेत्रातील महागाई वाढली आहे,सहजीकच त्याचा परिणाम फळ बाजार आणि ज्यूस बाजारावर झाला आहे, फळांसोबत लिंबू,उस,साखरेची दरवाढ आणि वाढती मागणी यामुळे ज्युसचे दर वाढल्याने पुढील महिनाभर ही मागणी कायम राहील असा अंदाज विक्रेत्यांनी वर्तवला आहे.
मागील वर्षीचे दर सध्याचे दर
- ऊस 15 20
- संत्री। 35 40
- मँगो ज्यूस 20 25
- लिंबू सरबत 10 15
- मोसंबी 35 40