नाशिक - कोरोना विरोधात लढ्यात आपल्या जीवाची पर्वा न करणार्या नाशिक वाहतूक पोलिसांना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून कौतुकाची थाप मिळाली आहे. या संकट काळात सर्वकाही विसरून आपले कर्तव्य चोखपणे बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा शहरातील स्वामीनारायण पोलीस चौकी येथे एसीपी मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कोरोनामुळे वाढदिवस किंवा आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा न करता आलेल्या कर्मचाऱ्यांचे वाढदिवस देखील या ठिकाणी साजरे करण्यात आले. वरिष्ठांकडून मिळालेल्या कौतूकाची थाप आणि अनोख्या गिफ्टने कर्मचारी भारावून गेले होते.
माणसाचा अदृश्य शत्रू असलेल्या कोरोना विरोधी लढ्यात नाशिक वाहतू पोलीस जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. या आपत्ती काळात त्यांना सुखाचे काही क्षण मिळावे यासाठी, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने, शहरातील वाहतूक शाखा युनिटेक स्वामीनारायण पोलीस चौकी येथे छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पोलिसांच्या कौतूकाच्या या अनोख्या कार्यक्रमात, फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करत पोलीस महासंचालकांतर्फे निवड करण्यात आलेल्या पोलीस महासंचालक सन्मान चिन्हाच्या मानकऱ्यांना, एसीपी मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या हस्ते सन्मान चिन्हांचे वाटप देखील करण्यात आले. तसेच कोरोना आपत्तीमुळे आपले किंवा आपल्या लग्नाचे वाढदिवस कर्तव्यावर असल्यामुळे रस्त्यावरच घालवावे लागलेल्या पोलिसांचे वाढदिवस देखील या ठिकाणी साजरे करण्यात आले.
हेही वाचा - परप्रांतीय मजुरांच्या मदतीला धवली 'लालपरी'; 200 नागरिकांना घरी पाठवण्यास लावला हातभार
हेही वाचा - बाजारभावा अभावी टोमॅटोच्या उभ्या पिकात शेतकरी सोडतोय जनावरे तर कुठे फिरवला जातोय नांगर