येवला ( नाशिक ) - विविध क्षेत्रात मुले अधिकारी होताना बघत असतो. मात्र, रमेश सोनवणे व त्यांची पत्नी स्मिता सोनवणे हे दोघेही रसवंतीचा व्यवसाय करत असून त्यांचा मुलगा शुभम हा शिक्षण करून त्यांना रसाच्या दुकानावर मदत करत आज तो एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन जलसंधारण अधिकारी झाला ( water conservation officer ) आहे.
आई वडिलांना मदत करून करायचा शिक्षण - सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील मूळ रहिवासी असलेले रमेश सोनवणे हे आपल्या गावी शेती करत होते. मात्र, पावसाळ्यातच जेमतेम पीक निघायचे त्यामुळे उदरनिर्वाह मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याचा त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे गेले वीस ते पंचवीस वर्षांपासून येवला बसस्थानकासमोर रसवंती गृह चालवक आहेत. त्यांचा मुलगा शुभमही लहानपणापासून रसवंती दुकानावर आई-वडिलांना मदत करत त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ( MPSC ) परीक्षा उत्तीर्ण करत तो आज जलसंधारण अधिकारी झाला आहे.
आई वडीलाचे स्वप्न पूर्ण - आम्हाला शिक्षण देताना आई वडीलांनी खूप कष्ट केले. याची जाणीव होती. आपला मुलगा एखादा मोठा अधिकारी व्हावा, असे आई वडीलाचे स्वप्न होते. ते स्वप्न मी पूर्ण केले आहे, अशी प्रतिक्रिया शुभम सोनवणे याने दिली.
हेही वाचा - फळांच्या किंमती वाढल्याने रसाचे दरही वाढले