ETV Bharat / state

Ranjitsinh Disale : डिसले गुरुजींचा परदेशात जाण्याचा मार्ग अखेर मोकळा, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे सीईओंना निर्देश - ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले

ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांच्या परदेशात स्कॉलरशिपसाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

Ranjitsinh Disale news
Ranjitsinh Disale news
author img

By

Published : Jan 22, 2022, 3:17 PM IST

Updated : Jan 22, 2022, 4:11 PM IST

नाशिक - ग्लोबल टिचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांच्या परदेशात स्कॉलरशिपसाठी जाण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. याप्रकरणी राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. याशिवाय माझं सीईओंशी बोलणं झाले आहे. त्यांना स्कॉलरशिपसाठी आवश्यक ती परवानगी दिली जावी, त्यांना परदेशात पाठवायचं आहे, असे शिक्षणमंत्री डॉ. वर्षा गायकवाड यांनी इगतपुरी येथे स्पष्ट केले आहे.

ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले यांना अमेरिकेत पीएचडी मिळविण्यासाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यांची रजा मंजूर केल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री डाॅ.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

डिसले गुरुजींचा परदेशात जाण्याचा मार्ग अखेर मोकळा

डिसले यांनी प्रोसिजर प्रमाणे अर्ज दिला नव्हता -
इगतपुरी येथे सुरु असलेल्या मुंबई काँग्रेसच्या चिंतन शिबिरात सहभागी होण्यासाठी वर्षा गायकवाड आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांना माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेचे ते शिक्षक आहेत. त्यांनी पीएच.डी साठी रजा अर्ज केला होता. त्यावरुन शालेय प्रशासनाशी त्यांचा सुरु असलेला वाद राज्यभर चर्चेचा विषय ठरला. डिसले सरांबाबत मी प्रशासनाशी बोलले आहे. त्यांना रीतसर परवानगी दिली जाईल. डिसले यांनी प्रोसिजर प्रमाणे अर्ज दिला नव्हता. आता त्यांना प्रक्रियाप्रमाणे कार्यवाही करत परदेशी जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. डिसले यांना परवानगी देण्यासंदर्भात मी निर्देश दिले आहेत. तसेच डिसले सरांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

अमेरिकेत पीएचडीसाठी केली होती रजेची मागणी -
डिसले गुरुजी यांना अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी जायचे असल्याने त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे रजेची मागणी केली होती. मात्र तब्बल तीन वर्षे डिसले हे कामावर हजर नसल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असेही सांगण्यात आले होते. याबाबत माहिती मिळताच डिसले गुरुजी यांनी उद्विग्न होऊन राजीनामा देणार असल्याची प्रतिक्रिया दिली होती. या प्रकरणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व त्रुटी दूर करून उच्चशिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी डिसले गुरुजींना रजा मंजूर केल्याची माहिती दिली. डिसले गुरुजींना मागील वर्षी ग्लोबल टीचर अवार्ड देण्यात आल्याने जगभरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले होते.

Ranjitsinh Disale news
जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार
नियमानुसार अर्ज द्यावा, त्यावर विचार करू - शिक्षणाधिकारी

ग्लोबर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डीसले यांनी स्कॉलरशिपसाठी किंवा पीएचडीसाठी नियमानुसार अर्ज द्यावा, त्यावर विचार करू अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांनी ईटीव्ही भारतशी फोनवर बोलताना दिली आहे. पीएचडी किंवा स्कॉलरशिपसाठी त्यांना आम्ही नियमानुसार यावे असे सांगितले होते. सर्व सविस्तर माहिती द्यावी असे सांगितले असताना देखील त्यांनी अर्थाचा अनर्थ केला आणि माध्यमांसमोर वेगळीच माहिती दिली, असे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा -Nana Patekar on Dr. Amol Kolhe : कलाकार म्हणून काम करणं हे माझ्या उपजीविकेचं साधन; अमोल कोल्हे प्रकरणी नाना पाटेकरांनी व्यक्त केलं मत

डिसले गुरुजीनी वरिष्ठांवर केले आरोप -
शिक्षण खात्याने सोलापुरातील शिक्षण खात्यावर गंभीर आरोप करून वरिष्ठांकडून मानसिक त्रास होत असल्याचा आरोप केला आहे. पैशाची मागणी केली जात आहे असा देखील गंभीर आरोप रणजितसिंह डीसले यांनी केला आहे. यावर राज्यभर डिसले गुरुजींच्या समर्थनार्थ वादळ उठले आहे.

डिसले गुरुजींवर होणारी कारवाई थंडावणार -
डिसले गुरुजी 2017 ते 2020 पर्यंत शाळेत गैरहजर होते. तसेच प्रतिनियुक्तीवर असताना त्यांनी हजेरी का लावली नाही आणि त्यांचा पगार निघाला यावर शिक्षण खात्याने एक मोठा अहवाल तयार केला असून त्यावर कारवाई होणार होती. पण राज्यभरात झालेल्या आरोप प्रत्यारोपानंतर सोलापुरातील शिक्षण खाते थोडीशी नमती भूमिका घेताना दिसत आहे. आता तयार झालेल्या त्या फाईलचे काय करणार किंवा कारवाई होणार का नाही, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

हे ही वाचा - Nude Dance Nagpur : सकाळी शंकरपट, रात्री 'आशिक बनाया अपने'; डान्स हंगामाने उडाली खळबळ

फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी अमेरिकेला जाणार -
रणजितसिंह डिसले यांना अमेरिकेत सहा महिन्यांच्या शिक्षणासाठी फुलब्राईट स्कॉलरशिप मिळाली होती. त्यासाठी ते सोलापुरातील शिक्षण खात्यात आले आणि एका साध्या कागदावर अर्ज केला होता. त्यावर शिक्षण अधिकारी डॉ. किरण लोहार यांनी रीतसर आणि नियमानुसार अर्ज करण्यास सांगितले. त्याबाबत ईटीव्ही भारतला शनिवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास शिक्षणाधिकारी यांनी सांगितले की, त्यांनी पीएचडी किंवा स्कॉलरशिपसाठी रीतसर आणि शासकीय नियमानुसार अर्ज केला तर त्यावर आम्ही विचार करू असे सांगितले.

रणजितसिंह डिसले दुसऱ्यादा कोरोना पॉझिटीव्ह-
ग्लोबल पुरस्कार विजेते यांना शुक्रवारी सायंकाळी सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवत होता. उपचारासाठी त्यांनी रुग्णालयात तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी वर्षभरापूर्वी देखील त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.

डिसले गुरुजींसारख्या शिक्षकांची राज्याला गरज - बच्चू कडू

डिसले गुरुजी यांनी नाराज होऊ नये आणि दुःखही व्यक्त करू नये. त्यांच्या सारख्या शिक्षकांची राज्याला गरज आहे. काही थोड्या चुका प्रशासनाकडून झालेल्या दिसून येत आहेत, त्या संदर्भात चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल. परदेशात जाण्यासाठी त्यांनी जो अर्ज दिला होता तो साध्या कागदावर दिला आहे, त्यामुळे त्याच्या परदेशात जाण्याच्या परवानगीला थोडा विलंब झाला आहे. प्रशासनानेच प्राथमिक पातळीवर हे लक्षात घेतले असते तर ही वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.

Last Updated : Jan 22, 2022, 4:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.