ETV Bharat / state

नाशिकमध्ये कलाकारांनी खेळली कोरड्या रंगाची रंगपंचमी - Artists' color festival

नाशिकमध्ये होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे नागरिकांनी म्हणावा तसा सहभाग घेतला नाही. मात्र, कलाक्षेत्रातील व्यक्तींनी एकत्रित येत परशुराम सायखेडकर नाट्यगृहाबाहेर कोरड्या रंगाची रंगपंचमी खेळत आनंदोत्सव साजरा केला.

Artists' color festival
कलाकारांची होळी
author img

By

Published : Mar 14, 2020, 9:59 AM IST

नाशिक - कोरोना विषाणूच्या सावटाखाली नाशिकमध्ये रंगपंचमीचा सण साजरा करण्यात आला. नाशिकच्या कलाकारांनी एकत्र येऊन शहरातील परशुराम सायखेडकर नाट्यगृहाबाहेर कोरड्या रंगाची रंगपंचमी साजरी केली.

कलाकारांनी खेळली कोरड्या रंगाची रंगपंचमी

नाशिकमध्ये कोरोना सदृश्य सहा रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे नाशिककरांनी समाधान व्यक्त केले. नाशिकमध्ये होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे नागरिकांनी म्हणावा तसा सहभाग घेतला नाही. मात्र, कलाक्षेत्रातील व्यक्तींनी एकत्रित येत परशुराम सायखेडकर नाट्यगृहाबाहेर कोरड्या रंगाची रंगपंचमी खेळत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी संगीत, नृत्य, नाटक, चित्रपट लेखन-दिग्दर्शन, चित्रकला, गायन या क्षेत्रातील व्यक्ती एकत्र आल्या होत्या.

हेही वाचा - 'फिलहाल' गाण्याचे नवे व्हर्जन प्रदर्शित, पाहा व्हिडिओ

गायिका गीता माळींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. जनस्थान ग्रुपची सदस्या असलेल्या गायिका गीता माळी यांचे काही महिन्यापूर्वी अपघाती निधन झाले. दरवर्षी गीता माळी उस्फुर्तपणे रंगपंचमी उत्सवात सहभाग घेत असे. यावर्षीच्या रंगपंचमीला त्यांची कमतरता भासत असल्याचे बोलून अनेकांनी त्यांच्या आठवणींनी उजाळा दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.