ETV Bharat / state

कोविड लॅबला किटचा नियमित पुरवठा होईल - राजेश टोपे - कोरोना विषाणू

बुधवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मालेगावचा दौऱ्यानंतर सायंकाळी डॉ. पवार कोविड रुग्णालयाला भेट दिली. यावेळी येथील उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस करून कोरोना लॅबची पाहणी केली.

Rajesh Tope
राजेश टोपे
author img

By

Published : May 14, 2020, 12:10 PM IST

नाशिक - गेल्या काही दिवसांत कोरोना टेस्टिंग लॅबला किटचा पुरवठा सुरळित होत नव्हता. त्यामुळे स्वॅब तपासणीत अडथळा निर्माण होत होता. मात्र, यापुढे टेस्टिंग लॅबला किटचा नियमित पुरवठा केला, जाईल याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.

राजेश टोपे, आरोग्यमंत्री

बुधवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मालेगावचा दौऱ्यानंतर सायंकाळी डॉ. पवार कोविड रुग्णालयाला भेट दिली. यावेळी येथील उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस करून कोरोना लॅबची पाहणी केली.

पुढे बोलताना टोपे म्हणाले, पुढील काही दिवसांत हॉटस्पॉट परिसर बंदच असतील. धार्मिक स्थळे खुली करता येणार नाहीत. त्यामुळे कोरोनासोबत जगण्याची तयारी करावीच लागेल. मालेगावमध्ये हज हाऊस अधिग्रहित केले जाणार आहेत. मालेगावात टेलिमेडीसीन व टेलिरेडिओग्राफी 2 दिवसात सुरु होइल, असेही टोपे यांनी यावेळी सांगितले.

डिस्चार्जच्या नवीन मार्गदर्शक सूचना पाळण्यात येणार आहेत. त्यामुळे निगेटिव्ह आलेल्या रुग्णाला कोणतीही लक्षणे नसल्यास त्याला 10 दिवसात टेस्ट न करता डिस्चार्ज दिला जाईल. 50 पेक्षा जास्त वय असलेल्या पोलिसांना बंदोबस्तासाठी तैनात करू नये, अशी सूचना गृहमंत्रालयाला केली असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याबाहेरील प्रवास वाढल्यास कोरोनाचा फैलाव अधिक होईल, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.