ETV Bharat / state

वैद्यकीय महाविद्यालय याच वर्षी सुरू करणार - राजेश टोपे

author img

By

Published : Feb 21, 2020, 10:05 AM IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातूनच आरोग्य यंत्रणेला जास्तीत जास्त डॉक्टर्स मिळावेत, यासाठी प्रयत्नशील आहोत. नाशिमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 2020-2021मध्ये पूर्ण होईल, असे मंत्री राजेश टोपे म्हणाले.

rajesh-tope-said-that-medical-college-should-be-started-this-year
वैद्यकीय महाविद्यालय याच वर्षी सुरू करनार - राजेश टोपे

नाशिक - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातूनच आरोग्य यंत्रणेला जास्तीत जास्त डॉक्टर्स मिळावेत, यासाठी प्रयत्नशील असून नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची मागणी 2020-2021 मध्ये पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी संदर्भ रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय ही दोन्ही रुग्णालये महाविद्यालयांशी संलग्न करण्यात येतील. वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी आवश्यक त्या तरतुदी केल्या जात असून आवश्यक त्या सुविधा पुरवण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

टोपे नाशिक दौऱ्यावर आले असता, त्यांनी विभागीय संदर्भ रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. या प्रसंगी त्यांनी रुग्णालयांची पाहणी करत डॉक्टर व पारिचारिकांशी संवाद साधला. यावेळी टोपे म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा दर्जा वेगळा असतो. राज्यात जास्तीत जास्त डॉक्टर निर्मिती शासकीय महाविद्यालयांमधून व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रत्येक जिल्ह्यात एकवैद्यकीय महाविद्यालय असले पाहिजे, अशी मागणी होत असली तरी राज्यात एकाच वेळीसर्व जिल्ह्यात डॉक्टर्स आणि सोयी सुविधांसह अशी महाविद्यालय उघडण्यासाठी निधीची कमतरता भासेल. त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी प्राधान्यक्रमाने महाविद्यालये उभारण्यात येतील. त्यासाठी केंद्रीय योजनांचाही लाभ घेण्यात येईल. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील उपकरणांची पाहणी टोपे यांनी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयांतील रिक्त पदांची तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मिळवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याचीही माहिती घेतली. यावेळी बोलतांना कॅन्सर रुग्णांसाठी असलेले रेडिएशन मशिन वारंवार बंद पडत असल्याच्या तक्रारी आल्या त्यावर अत्याधुनिक नवीन मशिनघ्यावे त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवावा असे टोपे यांनी सांगितले.

या रुग्णालयात दिवसभरात हृदयविकाराशी संबधीत दैनंदिन 20 ते 25 शस्त्रक्रिया होतात. मात्र, आगामी वैद्यकीय महाविद्यालय आणि पाचही जिल्ह्याचे मुख्य रुग्णालय हे महत्व लक्षात घेवून खांटासह डॉक्टर्स कर्मचारी आणि सुविधा वाढविण्यात येतील असे आश्वासनही त्यांनी दिले. दिर्घ काळचालणाऱ्या उपचारास कंटाळून काहीरूग्णांनी या रूग्णालयाच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केल्या आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी योग्य प्रकारच्या जाळ्या लावून सीसीटिव्ही यंत्रणेची व्याप्ती वाढवणार असल्याचे त्यांनी सुचित केले. यावेळी आमदार नितीन पवार,आमदार नरहरी झिरवाळ, आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नामपल्ली, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डेकाटे आदींसह डॉक्टर्स आणि अधिकारी उपस्थीत होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.