ETV Bharat / state

विधानसभेच्या तयारीला लागा! केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा ठरला - Assembly Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास निश्चित झाला असून येत्या 27 आणि 28 सप्टेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र दौरा करणार आहे. या बैठकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल मिळणार असल्याची माहिती आहे.

Assembly Election 2024
केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा (Source - ETV Bharat)

मुंबई Assembly Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या दौरा करणार आहे. येत्या 27 आणि 28 सप्टेंबर रोजी आयोगाचा मुंबई दौरा आयोजित करण्यात आलाय. निवडणुक आयोगाच्या बैठकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल मिळणार असल्याची माहिती आहे.

दौऱ्यामध्ये निवडणुक आयोग राज्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करतील. विधानसभेच्या निवडणुका घेण्याबाबत काय तयारी झालीय, कोणती तयारी बाकी आहे, याबाबतचा एकूण आढावा घेण्यात येईल. निवडणुक आयोगाच्या या दौऱ्यामुळं राज्यातील विधानसभा निवडणुका संदर्भातील घडामोडींना वेग आलाय. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीची माहिती देण्यासाठी निवडणूक आयोग 28 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेणार आहे. सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यापूर्वी निवडणुक आयोगाकडुन प्रत्येक राज्याचा दौरा करण्यात येतो.

मुख्यमंत्रिपदावरून वाद : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्याने राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या तयारीला मोठा वेग आला आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून चर्चां सुरूय दुसरीकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असावा यावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वाद सुरू झालाय.

हेही वाचा

  1. आंबेडकरांकडून तिसऱ्या आघाडीची घोषणा, यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाला मदत नाही - Prakash Ambedkar
  2. पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभारावर कृषी विभागाचे गंभीर शेरे; अधिकाऱ्यांना खडसावत मुनगंटीवारांनी दिल्या 'या' सूचना - Pik Vima Yojana
  3. जितेंद्र आव्हाडांवर अटकेची टांगती तलवार ? अटक टाळण्यासाठी ठाणे न्यायालयात जामीन अर्ज दाखल; नेमकं प्रकरण काय? - Jitendra Awhad

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.