ETV Bharat / state

वडपाटी पाझर तलावाजवळ खोदली विहीर.. येवल्यातील राजापूर गावचा पाणी प्रश्न मिटणार - नाशिक बातमी

वडपाटी पाझर तलावाजवळ ५३ फुट विहीर खोदून राजापूर गावापर्यंत ३८०० मीटर अंतराची पाईपलाईन करण्यात आली आहे. लोहशिंगवे येथून गावासाठी पाणीपुरवठा योजना आहे.

rajapur-village-water-problem-solve-in-nashik-district
येवल्यातील राजापूर गावचा पाणी प्रश्न सुटला...
author img

By

Published : Jun 29, 2020, 1:28 PM IST

येवला (नाशिक)- येवला तालुक्यातील राजापूर गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. येवला तालुक्यातील राजापूरमध्ये दरवर्षी पाण्याची टंचाई असते. दरवर्षी उन्हाळ्याचे चार महिने नागरिकांना कसरतीचे काढावे लागतात. मात्र, वडपाटी पाझर तलावाजवळ विहीर खोदल्याने आता गावचा पाणी प्रश्न मिटणार आहे.

वडपाटी पाझर तलावाजवळ ५३ फुट विहीर खोदून राजापूर गावापर्यंत ३८०० मीटर अंतराची पाईपलाईन करण्यात आली आहे. लोहशिंगवे येथून गावासाठी पाणीपुरवठा योजना आहे. मात्र, यातून आठ महिनेच गावाला पाणी मिळते. माजी सरपंच प्रमोद बोडके व येवला पंचायत समितीचे माजी सभापती पोपटराव आव्हाड व सदस्यांनी प्रयत्न करून वनविभागाकडून वडपारी तलावाजवळ विहिरीची परवानगी मिळवली.

वनविभागाच्या जाचक अटींमुळे पाणीपुरवठा योजना रखडली होती. त्यामुळे राजापूर येथील माजी सरपंच प्रमोद बोडके, माजी सभापती पोपट आव्हाड, ग्रामपंचायतीचे सदस्य भारतवाघ, बबन अलगट, बाळू अलगट यांनी मागील वर्षी राजापूर येथे आमरण उपोषण केले. महिलांनाही रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे वन विभागाने या योजनेला मान्यता दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.