नाशिक - लॉकडाऊनमुळे आपल्या गावाकडे पायी निघालेल्या दररोज 1 हजार 500 परप्रांतीयांना दिंडोरी तालुक्यातील जवळके दिंडोरी तर्फे अन्नदान करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते तुकाराम जोंधळे व जानोरी उपसरपंच गणेश तिडके आणि ग्रामस्थांमार्फत गेल्या 15 दिवसांपासून दररोज मुंबई-आग्रा महामार्गावरुन पायी जाणाऱ्या परप्रांतीयांना या उपक्रमाद्वारे जेवण देण्यात येते.
मुंबई, कल्याण, ठाणे, इगतपूरी व नाशिक, सिन्नर, संगमनेर येथे कामासाठी आलेले परप्रांतीय नागरिक मुंबई-आग्रा महामार्ग क्रंमाक 3 वरून गेल्या पंधरा दिवसांपासून आपल्या गावाकडे पायी निघाले आहेत. त्यावेळी ते गावाला जात असताना आम्हाला खाण्यासाठी भाकरी द्या, आम्ही मुंबईवरून पायी आलो आहेत, असे जवळके दिंडोरी आणि जानोरी येथील नागरिकांना सांगत होते. त्यामुळे गावामध्ये अन्नदानाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
या ठिकाणी दररोज एक ते दिड हजार पायी चालनाऱ्या नागरिकांना सकाळी 11 वाजल्यापासून जेवनाची पाकिटे तयार करुन दिली जातात. नाशिकच्या बळीमंदीर ते बसंवत पिंपळगावपर्यंत पायी चालणाऱ्या प्रवाशांना ही अन्नाची पाकिटे दिली जातात. मुलांना दूध व पाणी बॉटल दिल्या जात आहेत.