नाशिक : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर सकाळी शिवाजी पार्कमध्ये मॉर्निग वॉक करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याने ते जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे, या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक मधील मनसैनिक आक्रमक झाले,त्यांनी नाशिकच्या राजगड या कार्यालयाबाहेर आंदोलन केले यावेळेस अज्ञात हल्लेखोरांना विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली,तसेच या भ्याड हल्ल्याचा त्यांनी निषेध केला.या हल्लेखोरांवर गृहमंत्री यांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा मनसे स्टाईल उत्तर देण्यात येईल असा इशारा यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे..
लाकडी दंडुके घेऊन आंदोलन : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याने त्याचे पडसाद नाशिक मध्ये दिसून आले, एकेकाळी नाशिक हा बालेकिल्ला होता,याच नाशिक शहरात मनसे सैनिकांनी,मनसेच्या राजगड कार्यालया बाहेर आंदोलन केल,यावेळी आंदोलनकर्त्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी हातात लाकडी दंडुके घेऊन जोरदार घोषणाबाजी केली,हल्लेखोरांना त्वरीत अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
आमच्या कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी : आमचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेध आहे, मुंबई पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे ते लवकरच आरोपींना अटक करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई ही होईल, मात्र त्यानंतर या हल्लेखोरांनी आमच्या कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा नाशिकचे मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी दिला आहे
जिथे भेटेल तिथे ठोकून काढू : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा आम्हाला सांगा आम्ही त्यांचा शोध घेऊन त्यांना जिथे भेटेल तिथे ठोकून काढू, कारण सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहे,असं मत मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - Underworld Don Arun Gawli : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटकेसाठी उच्च न्यायालयात धाव