नाशिक - महाराष्ट्राची वारी हे जागतिक वैभव आहे. मात्र, मुघल विकास आघाडीने पायी वारीवर खोडा घातला. इटालियन विचारसरणीवर मुख्यमंत्र्यांनी साष्टांग लोटांगण घातले. वारीवर बंदी हा निर्णय वारकऱ्यांना मान्य नाही. हा वारकऱ्यांचा अपमान आहे. मुक्ताईनगरच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. सरकारने तातडीने निर्णय बदलावा अन्यथा निर्णय धुडकावून पंढरपूरकडे प्रस्थान करू, असा इशारा भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
पायी वारीला परवानगी द्यावी, वाटेतील कोणत्याही गावात वारी जाणार नाही
वसंतस्मृती कार्यालयात शनिवारी (दि. 12 जून) पत्रकार परिषद घेत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मर्यादित वारकऱ्यांसह पायी वारीला परवानगी द्यावी. वाटेतील कोणत्याही गावात वारी जाणार नाही. भाजप धर्माचे राजकारण करत नाही. आम्ही स्वधर्माचे आणि महाराष्ट्र धर्माचे रक्षण नक्की करणार. शेकडो वर्षांची परंपरा, प्रातिनिधिक स्वरूपात पायी जाण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यानी केली आहे.
पायी वारीला, निर्बंधांसह परवानगी द्या अन्यथा...
ज्येष्ठ नागरीक वारीत नसतील. लसीकरण झालेलेच वारकरी सहभागी होतील. बार सुरू करण्यासाठी या सरकारचे प्रमुख पत्र लिहितात. मग वारीची परंपरा जपण्यासाठी का नाही, असा जाब त्यांनी विचारला. वारकरी संप्रदाय आणि सामान्य वारकऱ्यांची भूमिका हीच आमची भूमिका आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य निर्बंध घालून परवानगी द्या. निजाम, ब्रिटिशांनीही असा निर्णय घेतला नव्हता, असा घणाघात त्यांनी केला. पायी वारीला, निर्बंधांसाह परवानगी द्या. अन्यथा अनियंत्रित वाऱ्या महाराष्ट्रातून निघतील. मग कोणत्याही परिस्थितीला अजीत पवारच जबाबदार राहतील, असा इशारा देत वारीला परवानगीसाठी राज्यपाल कोशारी यांची भेट घेणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.
हेही वाचा - नाशिक -बिबट्याकडून घराबाहेर झोपलेल्या कुत्र्याची शिकार; थरार सीसीटीव्हीत कैद