नाशिक - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींनी राफेलवर बोलण्यापेक्षा मनमोहन सिंग यांनी बोलावे असे म्हणत आंबेडकरांनी राहुल गांधींचा समाचार घेतला. ते मनमाड विधानसभा मतदारसंघातील वंचितचे आघाडीचे उमेदवार राजेंद्र पगारे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
आंबेडकर म्हणाले की, राहुल गांधी यांना एवढाच सल्ला देतो की राफेल मध्ये जे घडलं ते मनमोहनसिंग यांनी सांगितले पाहिजे. कारण ते पंतप्रधान असताना राफेलचा करार झाला होता. राहुल गांधी राफेलवर काही तरी भलते सलते बोलतात आणि मोदी त्याला उचलून टाकतात. राहुलला पटकले की देशाची जनता म्हणते मोदी चांगला माणूस आहे.
हेही वाचा - वंचित बहुजन आघाडीने प्रचारासाठी आणले जादूगार
राहुल गांधी पुन्हा प्रचारात उतरले आहेत यावर बोलताना आंबेडकर म्हणाले, ते स्वत: प्रचारात उतरले की मोदींनी त्यांना उतरवले? पाच वर्षात भाजपने काय केले याची चर्चा चालू असताना राहुल गांधी यांनी आल्या आल्या राफेलची जुनी टेप वाजवायला सुरूवात केली. असा आरोप आंबेडकरांनी केला. तर सरकारने गुजरातसह इतर राज्यात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळवून घ्यावे. त्यासाठी त्यांना कोणी अडवले आहे का? असा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा - भाजपच्या जागा जास्त असल्यामुळे फडणवीसच मुख्यमंत्री होतील- रामदास आठवले
शेतकरी जोपर्यंत जात बघून मतदान करेल तोपर्यंत त्याला आत्महत्याच करावी लागेल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी विकासाच्या आणि स्थानिक मुद्द्यांवर मतदान करावे. असे आवाहन त्यांनी केले.