नाशिक - जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून उद्या प्रत्यक्षात मतदान होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील 1327 जागा बिनविरोध निवडून आल्याने उद्या प्रत्यक्षात 565 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 299 जागांसाठी प्रत्यक्षात मतदान होणार आहे. त्यासाठी 11 हजार 56 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहे. या निवडणुकीत 12 लाख 84 हजार मतदार असून त्यातील 6 लाख 11 हजार 654 महिला असून 6 लाख 72 हजार 443 पुरुष मतदारांचा समावेश आहे.
5 हजार 120 केंद्र -
या निवडणुकीसाठी 5 हजार 120 मतदान यंत्राची व्यवस्था करण्यात आली असून त्यातील 2 हजार 560 कंट्रोल युनिट आणि 2 हजार 560 बँलेट युनिटचा समावेश आहे. ही यंत्रणा मतदान केंद्रावर पोहचण्यासाठी 61 एसटी बसेस 402 जीप आणि 126 मिनी बसेसची व्यवस्था कऱण्यात आली आहे. मतदानासाठी 389 अधिकारी, तर 9 हजार 760 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
44 केंद्र संवेदनशील -
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 1952 मतदार केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून यातील 44 केंद्र हे संवेदनशील असून 8 केंद्र अतिसंवेदनशील आहे. या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
कोरोना संशयितांना शेवटच्या अर्धा तासात मतदानाची संधी -
मतदार केंद्रावर थर्मल स्कॅनिंग आणि हॅण्ड सॅनिटाझर व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांना तसेच क्वांटाइन असलेल्या रुग्णांना शेवटच्या अर्धा तासात मतदान करण्यास आयोगाने परवानगी दिली आहे.
हेही वाचा - नेत्यांनो जनतेला आश्वासने देताना जरा विचार करा, नाही तर 'काय' होते ते पहा!