ETV Bharat / state

मालेगाव येथे पोलीस बंदोबस्तास असलेल्या 50 वर्षीय पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

author img

By

Published : May 25, 2020, 8:13 PM IST

पोलीस अधिकारी मूळचे सिन्नरच्या नायगाव येथील आहेत. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वीदेखील नाशिकच्या ग्रामीण पोलीस दलातील नाशिकच्या हिरावाडी परिसरात राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.

मालेगाव येथे पोलीस बंदोबस्तास असलेल्या 50 वर्षीय पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू
मालेगाव येथे पोलीस बंदोबस्तास असलेल्या 50 वर्षीय पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक - ग्रामीण पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखा पथकात हवालदार म्हणून कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी मालेगाव येथे कोरोना बंदोबस्तासाठी ड्यूटी देण्यात आली होती. पोलीस बंदोबस्ताचा कालावधी झाल्यानंतर ते नाशिकला घरी परतले. यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आणि आज त्यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला.

आज दिवसभरात दोन मृत्यू झाल्याने नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 53 इतकी झाली आहे. बंदोबस्तात कालावधी आटोपल्यानंतर त्यांना घरी सोडण्यासाठी 8 दिवस क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, 4 दिवसांनंतर त्यांना ताप तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना नाशिकच्या झाकिर हुसेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना डॉ. वसंत पवार मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा 25 मे रोजी मृत्यू झाला.

पोलीस अधिकारी मूळचे सिन्नरच्या नायगाव येथील आहेत. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वीदेखील नाशिकच्या ग्रामीण पोलीस दलातील नाशिकच्या हिरावाडी परिसरात राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.

नाशिक - ग्रामीण पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखा पथकात हवालदार म्हणून कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी मालेगाव येथे कोरोना बंदोबस्तासाठी ड्यूटी देण्यात आली होती. पोलीस बंदोबस्ताचा कालावधी झाल्यानंतर ते नाशिकला घरी परतले. यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आणि आज त्यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला.

आज दिवसभरात दोन मृत्यू झाल्याने नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 53 इतकी झाली आहे. बंदोबस्तात कालावधी आटोपल्यानंतर त्यांना घरी सोडण्यासाठी 8 दिवस क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, 4 दिवसांनंतर त्यांना ताप तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना नाशिकच्या झाकिर हुसेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना डॉ. वसंत पवार मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा 25 मे रोजी मृत्यू झाला.

पोलीस अधिकारी मूळचे सिन्नरच्या नायगाव येथील आहेत. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वीदेखील नाशिकच्या ग्रामीण पोलीस दलातील नाशिकच्या हिरावाडी परिसरात राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.