ETV Bharat / state

तपोवनातील 'त्या' हत्येचा लावला आडगाव पोलिसांनी छडा..!

पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील सागर लिलके याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

नाशिक
नाशिक
author img

By

Published : Aug 7, 2020, 8:53 PM IST

नाशिक - 2 ऑगस्टला आडगाव परिसरात असलेल्या तपोवनात एका साठ वर्षीय व्यक्तीची डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. यानंतर आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तपासाची सूत्र हाती घेत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

दरम्यान, अवघ्या आठवडाभरात आडगाव पोलिसांना या खुनाचा उलगडा करण्यात यश आले. पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील सागर लिलके याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

2 ऑगस्टला रात्री मयत संतोष पवार आणि सागर लिलके यांच्यामध्ये दारू पिण्यावरून वाद झाला. या वादातून सागरने संतोषच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

दरम्यान, घटनास्थळी मारेकर्‍याने कोणताही ठोस पुरावा सोडलेला नसतानाही गुन्हे शोध पथकाने आपली यंत्रणा वापरून या प्रकरणाचा शिताफीने छडा लावला. त्यामुळे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने आडगावच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल जगदीश जाधव, पोलीस नाईक विजयकुमार सूर्यवंशी पोलीस शिपाई वाल्मिकी पाटील आणि योगेश घुगे यांना 25 हजार रोख रकमेचे बक्षीस जाहीर केले आहे. पोलिसांच्या कार्याची कौतुक होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.