ETV Bharat / state

मध्यरात्री गर्भवतीचा वाहनासाठी आक्रोश; 'खाकी' आली मदतीला धावून

नाशिक येथील गंगापूर भागात राहणाऱ्या भारती जाधव या गर्भवती महिलेला मध्यरात्री तीन वाजता प्रसव कळा सुरू झाल्या. मात्र, मदतीसाठी कोणीच येत नसल्याने त्यांच्या सासू-सासऱ्यांनी घराबाहेरून जाणाऱ्या पोलिसांची मदत मागितली. त्यांनी तत्काळ दुसऱ्या गाडीचे नियोजन करुन दिले. भारती या वेळेत रुग्णालयात पोहोचल्याने त्यांचा व बाळाचा जीव वाचला. रुग्णालयात दाखल होताच काहीर वेळाने भारती यांनी यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला.

भारती अन चिमुकली
भारती अन चिमुकली
author img

By

Published : Jan 5, 2021, 4:18 PM IST

Updated : Jan 5, 2021, 4:50 PM IST

नाशिक - येथील गंगापूर भागात राहणाऱ्या भारती जाधव या गर्भवती महिलेला मध्यरात्री तीन वाजता प्रसव कळा सुरू झाल्या. कल्पना या आपल्याला वयोवृद्ध सासू सासऱ्यासह रुग्णालयात जाण्यासाठी घरा बाहेर पडल्या. मात्र, रस्त्यावरुन जाणारे एकही वाहन त्याच्या मदतीसाठी थांबले नाही अशात गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी धाव घेत पोलीस वाहन बोलावून त्या महिलेला रुग्णालयात पोहोचविले आणि अवघ्या वीस मिनीटांत त्या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक

नेमके काय घडले

प्रसव कळा सुरू झाल्याने गंगापूर भागात राहणाऱ्या कल्पना जाधव या आपल्या वयोवृद्ध सासू सासऱ्यासह मध्यरात्री 3 वाजता घराबाहेर पडल्या आपल्याला कोणीतरी मदत करेल या हेतूने त्यांनी रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहने थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या मदतीला कोणच थांबत नव्हते. एकीकडे कल्पना यांना प्रसव कळा असाह्य होत असल्याने त्या मदतीसाठी रस्त्यावर आक्रोश करत होत्या. अशात गस्तीवर असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार यांचे वाहन समोर आले वयोवृद्ध सासर्‍याने त्यांचे पाय धरत आमच्या सुनेला वाचवा अशी विनवणी केली. पवार आणि सहकाऱ्यांनी तत्काळ नियंत्रण कक्षाला माहिती दिली. काही मिनिटातच गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे गिरीश महाले, राहुल सोळसे, सचिन सुफले, भारत बोळे दुसरे वाहन घेऊन आले. त्या महिलेला रुग्णालयता दाखल केले. आरोग्य केंद्रात अवघ्या वीस मिनिटात भारती यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. नातेवाईकांनी पोलीसरूपी देव भेटल्याचे सांगत त्यांच्या अश्रूला वाट करून दिली. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या हस्ते गंगापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

हे पोलिसांचे कर्तव्यच

मध्यरात्रीही महिला मदतीसाठी याचना करत होती. पथकातील अधिकाऱ्यांनी तत्काळ मदत केल्याने सुखरूप प्रसूती झाली. आणखी वेळ झाला असता तर आई आणि मुलीच्या जीवावर बेतले असते. अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करणे हे पोलिसांचे कर्तव्यच आहे, असे गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अंचल मुदगल यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - नाशिक : नायलॉन मांजा आढळल्यास दुकान परवाने रद्द करणार, पोलीस आयुक्तांची माहिती

हेही वाचा - विवाहबाह्य संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाचा पित्याकडून खून

Last Updated : Jan 5, 2021, 4:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.