नाशिक - शहाराची सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी पर्यावरणपूरक बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी विश्वास नागरे पाटील यानी संहकुटुब विधिवत पुजा करून शहरात सुखशांती राहो अशी बाप्पा चंरणी प्रार्थना केली.
हे ही वाचा - बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचं आगमन, 'अशा' दिल्या शुभेच्छा
नाशिक शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा तत्पर असून गणेशोत्सव काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता तीन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असल्याचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सागितले.
हे ही वाचा - 'देवा श्री गणेशा', बॉलिवूडच्या 'या' गाण्यांनी साजरा करा गणेशोत्सव
दरम्मान, विश्वास नांगरे पाटील यांचे श्रीगणेशाची स्थापना करण्याचे हे दहावे वर्ष आहे. यंदादेखील त्यांनी शाडू मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना केली असून पर्यावरण पूरक चटईचा घरगुती देखावा देखावा केला आहे.
हे ही वाचा - गणेशोत्सव विशेष : कसे असावे गणेशपूजन, जाणून घ्या गणेशोत्सवातील 10 दिवसांचे महत्त्व