नाशिक - कोरोना प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी राज्य सरकारने नागरीकांना घरीच राहून नववर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन केले होते. नाशिकमध्ये 31 डिसेंबरला रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पोलिसांकडून नाइट कर्फ्यु लावण्यात आला होता. यावेळी नाशिककरांनीदेखील नववर्षाचे स्वागत घरातच राहून केले.
नाशिक नाइट कर्फ्यु कारवाई फक्त 5 जणांवर पोलिसांची कारवाईनाशिककरांनी नववर्षाच्या स्वागतासाठी संयम दाखवला असे म्हणतात येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नाशिक शहरात रात्री 11 नंतर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अशात नववर्षाच्या स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतील ह्या दृष्टिकोनातून पोलिसांनी अधिक खबरदारी घेत 31 डिसेंबर रात्री 11 ते 1 जानेवारी सकाळी 6 वाजेपर्यंत नाइट कर्फ्यु लावला होता. ह्यासाठी शहरातील 32 ठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली होती. या काळात शहरात तीन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. नागरिकांनी देखील या कर्फ्युचे काटेकोरपणे पालन केले. शहरात अवघ्या पाच जणांवर ड्रिंक अँड ड्राइव्ह आणि कलम 142 कलम 122प्रमाणे कारवाई करण्यात आली.
हेही वाचा - 'संभाजीनगर'च्या मुद्यावरून राजकारण तापले