नाशिक : नवीन माेबाईल खरेदी करण्यासाठी वडील पैसे देत (Parents did not give money) नसल्याने 23 वर्षीय तरुणाने साेसायटीच्या चाैथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या (Youth Committed Suicide) केल्याची धक्कादायक घटना सातपूर परिसरातील श्रमिक नगरात मध्यरात्री घडली. (Latest news from Nashik) या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे (Nashik Crime).
चाैथ्या मजल्यावरून उडी मारली : अक्षय अरुण खेताडे (वय-23, रा. इस्पाईट हाईट्स, श्रमिक नगर, सातपूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय हा सध्या बेराेजगार हाेता. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वीच त्याचा माेबाईल हरविला हाेता. त्यामुळे ताे आई-वडिलांकडे नवीन माेबाईल घेण्यासाठी वारंवार पैशांचा तगादा लावत हाेता. मात्र मद्याची नशा करत असल्याने त्याच्या आईने त्याला माेबाईल खरेदीसाठी पैसे दिले नाही. त्यामुळे ताे नैराश्यात हाेता.
अतिरक्तस्रावाने मृत्यू : शुक्रवारी रात्री एक ते दीड वाजता अक्षयने साेसायटीतील घराच्या दरवाज्याची कडी बाहेरुन लावून घेतली. त्यानंतर ताे चाैथ्या मजल्यावर गेला व त्याने तेथून उडी मारुन घेतली. ही घटना लक्षात येताच त्याला कुटुंबाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डाेक्याला गंभीर दुखापत व अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत सातपूर पाेलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास केला जात आहे.