नाशिक - दिंडोरी बाजार समीतीच्या उप मार्केटमध्ये कांद्याची दरात मोठी वाढ झाली आहे. प्रति क्विंटल जवळपास 6 हजार 400 ते 8 हजार रुपयापर्यंत कांद्याला दर मिळतो आहे. शेतकऱ्यांकडे कांदाच उपलब्ध नसल्यामुळे बाजारात कांद्याचा भाव वाढत आहे.
नवीन कांदा बाजारात येण्यासाठी अवधी असल्यामुळे जुण्या कांदयाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त कांदा उत्पादक शेतकरी हे नाशिक जिल्ह्यात असल्यामुळे कांदा खरेदीसाठी नाशिक, मुंबई येथील व्यापारी येत असतात. नवा कांदा बाजारात येण्यासाठी किमान एक ते दिड महीना लागणार असून, बाजारात कांदा महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.