ETV Bharat / state

शेकडो क्विंटल कांदा चाळीत सडू लागला; शेतकऱ्यांनी केली मदतीची मागणी - नाशिक कांदा उत्पादक शेतकरी

उशिरा झालेल्या लागवडीमुळे ऐन उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल महिन्याच्या अखेरीस कांदा काढणीसाठी तयार झाला. याच काळात कळवण, सटाणा, देवळा, मालेगावमध्ये काही प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे काढलेला कांदा शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला. आता हा कांदा चाळीतच सडण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

Rotten onion
सडलेला कांदा
author img

By

Published : Jul 15, 2020, 12:30 PM IST

नाशिक(सटाणा) - नाशिक जिल्हा कांदा उत्पादनासाठी आणि बाजारपेठेसाठी ओळखला जातो. सध्या येथील कांदा उत्पादक अडचणीत सापडला आहे. चाळीत साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. शासनाने सरसकट किमान हमी भावाने कांदा खरेदी करून उत्पादकांना दिलासा द्यावा व किमान १० लाख टन कांदा निर्यात करावा, तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करावे, अशी मागणी, कांदा उत्पादक संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव व शेतकऱ्यांनी केली आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाल कांद्याचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे लाल कांद्याच्या एकरी उत्पादन फार मोठी घट झाली होती. दिवाळीच्या आसपास शेतकऱ्यांनी अनेक वेळा उन्हाळ कांद्याचे बियाणे टाकले, मात्र अवेळी आलेल्या पावसामुळे तेही उगवले नाही. परिणामी लागवडीसाठी उपयुक्त उन्हाळ कांद्याचे रोप डिसेंबर-जानेवारीपर्यंत उपलब्ध झाले मात्र, तेही कमी प्रमाणात. काही शेतकऱ्यांनी अगदी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कांदा लागवड केली. उशिरा झालेल्या लागवडीमुळे ऐन उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल महिन्याच्या अखेरीस कांदा काढणीसाठी तयार झाला. याच काळात कळवण, सटाणा, देवळा, मालेगावमध्ये काही प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे काढलेला कांदा शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला.

कांदा काढणीच्यावेळी राज्यात लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना कांद्याची विक्री करता आली नाही. अवकाळी पावसाचे पाणी लागलेला हा साठवलेल्या चाळ्यांमध्येच खराब होऊ लागला आहे. हा कांदा दिवाळीपर्यंत टिकणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी चाळीतील कांदा बाहेर काढायला सुरुवात केली आहे. सध्या देवळा तालुक्यातील विडेवाडी, भऊर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी चाळीत सडलेला कांदा बाहेर काढला आहे. भऊर येथील प्रगतीशील शेतकरी बाबुराव पांडुरंग पवार यांनी तर सडलेल्या कांद्याचे अनेक ट्रॅक्टर भरून फेकून दिले आहेत. त्यांच्यासारखीच परिस्थीती अनेक शेतकऱ्यांवर ओढावली आहे. त्यामुळे शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकरी संघटना आणि शेतकरी करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.