नाशिक - जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्यांची आवक घटल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत. बाजार समितीमध्ये कांदा 3,500 ते 4,000 रुपये क्विंटल दराने विक्री होत आहे. हाच कांदा किरकोळ बाजारात 50 रुपये किलोने ग्राहकांना खरेदी करावा लागत आहे.
जिल्ह्यासह देशातील बहुतांश भागात जोरदार पावसामुळे नवीन लाल कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली आहे. सद्यस्थितीत कांदा 3, 500 ते 4 हजार रुपये क्विंटल दराने विक्री होत आहे. ग्राहकांना हाच कांदा 50 रुपये दराने खरेदी करावा लागत आहे. जोपर्यंत नवीन कांदा बाजारात दाखल होत नाही, तोपर्यंत कांदा दराची अशीच परिस्थिती राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे.
हेही वाचा-ठाकरे पॅटर्न विसरून शिवसेनेची गांधी पॅटर्नकडे वाटचाल - देवेंद्र फडणवीस
पावसामुळे नुकसान-
नाशिक जिल्ह्यासह साऊथ, कर्नाटक, राजस्थान या भागात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे नवीन लाल कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच साठवणूक केलेल्या उन्हाळी कांदादेखील पावसामुळे खराब झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांकडे केवळ 40 टक्के कांदा शिल्लक आहे. त्यातदेखील बहुतांश कांदा खराब झाला आहे. पुढील 15 दिवसानंतर नवीन कांदा बाजारात दाखल झाल्यानंतर कांद्याचे भाव स्थिर होतील, असा अंदाज हिरामण परदेशी या कांदा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा-कर्नाटक: परीक्षा फी नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न करणारी मुलगी दहावीच्या परीक्षेत प्रथम
सर्वच वस्तू महाग-
कोरोनमुळे मागील दोन वर्षांपासून सर्वच कामगार वर्ग अडचणीत सापडला आहे. त्यात एक सणासुदीत पेट्रोल, धान्य, भाज्यासह कांदादेखील महाग झाला आहे. त्यामुळे घर कसे चालवावे असा प्रश्न पडला आहे. सरकारने सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणे गरजेचे असल्याचे मत मोनालिसा बुरकुले या महिलेने सांगितले आहे.
हेही वाचा-काळ्या कृषी कायद्यांप्रमाणेच नरेंद्र मोदी हे भारतासाठी काळे- राकेश टिकैत यांची खोचक टीका