ETV Bharat / state

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाचशे कोटींचे पॅकेज द्या; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे आणि राज्य प्रवक्ते शैलेंद्र पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरातील बाजार समितीत शेतकरी व व्यापाऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला. केंद्र व राज्य शासनाने मिळून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाचशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केली आहे.

Onion Grower Farmers
कांदा उत्पादक शेतकरी
author img

By

Published : Aug 13, 2020, 5:06 PM IST

नाशिक - कांद्याच्या दरात झालेली घसरण व चाळीत सडत असलेल्या कांद्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. केंद्र व राज्य शासनाने मिळून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाचशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केली आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाचशे कोटींचे पॅकेज द्या

राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे आणि राज्य प्रवक्ते शैलेंद्र पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरातील बाजार समितीत शेतकरी व व्यापाऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला. सद्यस्थितीत कांदाचाळीमधील कांद्याची स्थिती, बाजार समित्यांमध्ये कांद्याला मिळणारा दर याविषयी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. मागील चार ते पाच महिन्यांपासून कोरोनामुळे देशात सुरू असलेल्या सततच्या लॉकडाऊन, कांदा निर्यातीवर आलेल्या मर्यादा व देशांतर्गत कांद्याला मिळणारा कवडीमोल दर यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे.

उत्पादन खर्चापेक्षाही निम्म्या दराने कांदा विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. निम्म्यापेक्षाही जास्त कांदा चाळींमध्येच सडत असल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. केंद्र व राज्य सरकार एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारून नेत असून आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादकांना दोन्ही सरकारने मिळून पाचशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य करून तातडीने पॅकेजची घोषणा न केल्यास शेतकरी आक्रमक होतील. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर व तालुका स्तरावर तहसीलदार कार्यालयाबाहेर कांदे ओतून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.