ETV Bharat / state

त्र्यंबकेश्वरच्या आंबोली धरणात दोन विद्यार्थी बुडाले , एकाचा मृत्यू - Nashik Police News

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आंबोली धरणात आश्रमशाळेतील दोन विद्यार्थी बुडाले, यातील एकाला वाचवण्यात नागरिकांना यश आले, तर एकाचा मृत्यू झाला.त्र्यबकेश्वर तालुक्यातील आंबोली आश्रमशाळेचे विद्यार्थी वनभोजनासाठी गेले असता ही घटना घडली.

one-student-drowned-in-amboli-dam-in-trimbakeshwar
त्र्यंबकेश्वरच्या आंबोली धरणात दोन विद्यार्थी बुडाले , एकाचा मृत्यू
author img

By

Published : Jan 8, 2020, 7:19 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील आंबोली धरणात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रोशन लाखन असे मृत मुलाचे नाव आहे. त्याचबरोबर असणाऱ्या उत्तम धोंगडे या विद्यार्थ्याला वाचवण्यात नागरिकांना यश आले आहे.

त्र्यंबकेश्वरच्या आंबोली धरणात दोन विद्यार्थी बुडाले , एकाचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे वनभोजन आंबोली धरनावर आयोजित केले होते. यावेळी रोशन आणि उत्तम हे दोघे धरणाशेजारी गेले असता पाय घसरून पडले. यावेळी दोघेही धरणांत बुडाले. ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच दोघांपैकी एकाला वाचवण्यात यश आले. यामध्ये रोशन याचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोघेही तिसरीच्या वर्गात शिकत होते. अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

Intro:नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील आंबोली धरणात
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना
घडली आहे. रोशन लाखन असे मृत मुलाचे नाव आहे.
त्याचबरोबर असणाऱ्या उत्तम धोंगडे या विद्यार्थ्याला
वाचविण्यात नागरिकांना यश आले आहेBody:दरम्यान अधिक माहिती अशी की त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची वनभोजन आंबोली धरनावर आयोजित केले होते. यावेळी रोशन आणि उत्तम हे दोघे धरणाशेजारी असता पाय घसरून पडले. यावेळी दोघेही धरणांत बुडाले. हि बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच दोघांपैकी एकाला वाचविण्यात यश आले. यामध्ये रोशन याचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.दोघेही सोबत इयत्ता तिसरीत शिकत होते. अचानक
घडलेल्या या घटनेने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
Conclusion:..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.