ETV Bharat / state

नाशकातील नांदगाव-वेहेळगाव रस्त्यावर वऱ्हाडाचा टेम्पो उलटला; एक ठार, 45 जखमी

हातगाव येथील विलास आव्हाड यांच्या मुलीचे लग्न नाशिकच्या उपनगर येथील इच्छामणी लॉन्स येथे होते. लग्न आटोपल्यानंतर वऱ्हाडी घराकडे परतत असताना नांदगाव वेहेळगाव रस्त्यावरील जामदरी फाट्याजवळ चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्यावर पलटी झाला.

नाशकातील नांदगाव-वेहेळगाव रस्त्यावर वऱ्हाडाचा टेम्पो उलटला
author img

By

Published : May 30, 2019, 12:02 PM IST

नाशिक - वऱहाडाचा टेम्पो पलटी झाल्याने यात एकाचा मृत्यू झाला असून 45 जण जखमी झाले आहेत. नांदगाव वेहेळगाव रस्त्यावरील जामदरी फाट्याजवळ हातगाव चाळीसगाव येथील वऱ्हाड नाशिक येथे लग्नावरून परतताना हा अपघात झाला. यात सनी भाऊसाहेब आव्हाड या दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. जखमींवर नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत,

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हातगाव येथील विलास आव्हाड यांच्या मुलीचे लग्न नाशिकच्या उपनगर येथील इच्छामणी लॉन्स येथे होते. लग्न आटोपल्यानंतर वऱ्हाडी घराकडे परतत असताना नांदगाव वेहेळगाव रस्त्यावरील जामदरी फाट्याजवळ चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून वर्‍हाडातील 40 ते 45 जण जखमी झाले, आहेत. घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकेद्वारे जखमींना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

या अपघातात चंद्रकला आव्हाड, विजय आव्हाड,दत्तू आव्हाड, गाया आव्हाड, संजय आव्हाड, संगीता पाटील, राजाराम आव्हाड, लक्ष्मी आव्हाड, शांताबाई सांगळे, यमुनाबाई राठोड, रमेश आव्हाड, काजल आव्हाड यांच्यासह इतर जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी करत असून, नांदगाव पोलीस ठाण्यात याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:नांदगाव-वेहेळगाव रस्त्यावरील जामदरी जवळ वऱ्हाडाचा टेम्पो उलटल्याने एक ठार ,45 जखमी...

Body:नांदगाव वेहेळगाव रस्त्यावरील जामदरी फाट्याजवळ हातगाव चाळीसगाव येथील वराड नाशिक येथे लग्नावरून परततांना वडाच्या टेम्पो पलटी झाल्याने या घटनेत सनी भाऊसाहेब आव्हाड या दहा वर्षीय मुलागा ठार झाला आहे ,टेम्पोतील 40 ते 45 जण गंभीर जखमी झाले असून,नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत,

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हातगाव येथील विलास आव्हाड यांच्या मुलीचे लग्न नाशिकच्या उपनगर येथील इच्छामणी लॉन्स येथे होते,लग्न आटोपल्यानंतर वऱ्हाडी घराकडे परतत असताना नांदगाव वेहेळगाव रस्त्यावरील जामदरी फाट्याजवळ टेम्पो चालकाचे टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्यावर पलटी झाला,यात अपघातात सनी भाऊसाहेब आव्हाड या दहा वर्षीय मुलगा ठार झाला वर्‍हाडातील 40 ते 45 जण जखमी झाले, घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकेत द्वारे जखमींना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले,यावेळी वैद्यकीय अधीक्षक रोहन बोरसे यांच्यासह डॉक्टरांनी रुग्णालयात येऊन जखमींवर उपचार केले...यावेळी सामाजिक कार्यकर्ते यांची देखील यावेळी मोठी मदत झाल्याचे दिसून आलं,

या अपघातात चंद्रकला आव्हाड ,विजय आव्हाड,दत्तू आव्हाड, गाया आव्हाड, संजय आव्हाड, संगीता पाटील,राजाराम आव्हाड, लक्ष्मी आव्हाड, शांताबाई सांगळे, यमुनाबाई राठोड, रमेश आव्हाड ,काजल आव्हाड यांच्यासह इतर जखमींवर रूग्णालयात उपचार करण्यात आले..या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी करत असून, नांदगाव पोलीस ठाण्यात याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.