ETV Bharat / state

गोव्याहुन विक्रीसाठी येणारा एक कोटींचा अवैध मद्यसाठा नाशिकमध्ये जप्त

author img

By

Published : Apr 25, 2021, 1:58 PM IST

गोव्याहुन नाशिकला विक्रीसाठी येणारा तब्बल एक कोटी रुपयांचा मद्यसाठा नाशिक उत्पादन शुक्ल विभागाने सापळा रचून पकडला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन्हीही आरोपी राजस्थान येथील आहेत.

Nashik
Nashik

नाशिक : गोव्याहुन नाशिकला विक्रीसाठी येणारा तब्बल एक कोटी रुपयांचा मद्यसाठा नाशिक उत्पादन शुक्ल विभागाने सापळा रचून पकडला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गाडीत चोर कप्पा बनवून मद्याची वाहतूक -

येवला टोल नाक्यावर खबऱ्यामार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई केली आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक केली आहे. गाडीतील आतील भागात चोर कप्पा बनवला होता. त्यातून मद्याची वाहतूक केली जात होती.

या कारवाईत राजस्थान येथील भगवानदास कुशवाह, विनोद कुशवाह या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून पुढील कारवाई करत असल्याचं राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नाशिक विभागाचे मनोहर अंचुळे यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.