ETV Bharat / state

पेट्रोलपंप दरोडा : जमावाच्या मारहाणीत दरोडेखोराचा मृत्यू, तिघे पोलिसांच्या ताब्यात - crime in nashik

कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावाजवळील श्री साई पेट्रोल पंपावर चार दरोडेखोरांनी दरोडा टाकला. शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास कोयत्याच्या सहाय्याने हल्ला करत दरोडेखोरांनी चोरी केली.

nashik crime news
पेट्रोलपंप दरोडा : जमावाच्या मारहाणीत दरोडेखोराचा मृत्यू, पलायनानंतर तिघे पोलिसांच्या ताब्यात
author img

By

Published : Jul 20, 2020, 6:29 PM IST

नाशिक - कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावाजवळील श्री साई पेट्रोल पंपावर चार दरोडेखोरांनी दरोडा टाकला. शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास कोयत्याच्या सहाय्याने हल्ला करत दरोडेखोरांनी चोरी केली. यानंतर पळून जाणाऱ्या आरोपींचा जमावाने पाठलाग करत दोघांना पकडले. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उर्वरित तिघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पेट्रोलपंप दरोडा : जमावाच्या मारहाणीत दरोडेखोराचा मृत्यू, पलायनानंतर तिघे पोलिसांच्या ताब्यात

कळवण येथील नाशिक रस्त्यावर आबा सूर्यवंशी यांचा पेट्रोल पंप आहे. शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास चार दरोडेखोरांनी धारदार शस्त्रासह पेट्रोल पंपावर हल्ला केला. यामध्ये पंपावरील दोन कर्मचारी जखमी झाले. यावेळी चोरट्यांनी पंप मालकाकडून सोन्याचे ब्रेसलेट, सोन्याची चैन, मोबाइल व रोख रक्कम लंपास करून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, त्या ठिकाणी आलेल्या पीकअपमधील मजुरांना हि घटना समजताच त्यांनी दरोडेखोरांचा पाठलाग करत दोघांना पकडले. यावेळी जमावाने केलेल्या मारहाणीत दोन्ही आरोपी जखमी झाले होते. त्यांना नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील तेजस सूर्यवंशी या जखमी आरोपीचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पेट्रोल पंपावर जबरी चोरी केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीच्या मृत्यू प्रकरणी जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जमावातील काही संशयितांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.