ETV Bharat / state

Bakri Eid 2023 : बकरी बाजारात कोट्यवधीची उलाढाल; 'या' बकऱ्यांना ग्राहकांची मोठी मागणी...

बकरी ईद निमित्त मुस्लिम धर्मात बकऱ्यांच्या कुर्बानीची परंपरा आहे. या अनुषंगाने दरवर्षी या काळात देशभरात बकरी बाजारात कोट्यवधीची उलाढाल पाहायला मिळते. नाशिकच्या फाळके रोडवरील घास बाजार येथे मौला बकरी खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. नाशिकसह अशोका रोड, वडाळा रोड, जयदीप नगर, मोहम्मद अली रोड पखाल रोड, वडाळा गाव येथे बकऱ्यांचे बाजार भरले आहेत.

Bakri Eid 2023
बकरी ईद
author img

By

Published : Jun 28, 2023, 7:59 PM IST

Updated : Jun 28, 2023, 8:42 PM IST

बकरी खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली

नाशिक : ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद 29 जून रोजी साजरी होणार आहे. या निमित्ताने नाशिक शहरात अनेक प्रकारचे बकरे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. ठिकठिकाणी बकरा बाजार सजले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरातसह विविध राज्यांमधून नाशिक शहरात कुर्बानीसाठी खास बकऱ्यांची आवक झाली आहे. शिरोही, सोजत, गुजरी, अजमेरा, तोतापरी, कोटा भरभरा, काठियावडी अशा अनेक जातीचे बकरे साधारण 15 ते 45 हजार रुपये पर्यंत विकले जात आहे.

नगावर बकऱ्यांची विक्री : सामान्य दिवसांच्या तुलनेत बकरी ईदच्या वेळेस बोकड्यांच्या मागणीची प्रचंड वाढ असते. यावर्षी राजस्थानमधील आलेल्या बोकड्यांना ग्राहकांची जास्त पसंती मिळत आहे. त्यामुळे बाजारामध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे. काही वर्षापासून बोकडे वजना प्रमाणे विकले जायचे, पण यावर्षी मात्र नगावर विक्री सुरू झाली आहे. सोजत, गुजरी, शिरोही अशा अनेक प्रजाती बाजारात उपलब्ध आहे. अशी माहिती राजस्थान मधून आलेले बकरे विक्रेते मोहम्मद काझी यांनी सांगितले.

15 हजारात खरेदी केला बकरा : मुस्लिम धार्मिक परंपरेनुसार सर्वजण बकरी ईद साजरी करत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही एक बकरा 15 हजाराला खरेदी केला आहे. बकरी ईदच्या दिवशी त्याची कुर्बानी दिली जाणार आहे, तसेच बकरी ईद निमित्त समाजबांधवांमध्ये उत्साह दिसत आहे असे ग्राहकाने सांगितले.

ईदला कुर्बानीसाठी बकरे आणल्याने राडा : दुसरीकडे ठाण्यात अनेक मुस्लीम नेत्यांनी बकरी ईदसाठी कुर्बानी देऊ नये, असे आवाहन केले. परंतु काही ठिकाणी मात्र कुर्बानीसाठी बोकड आणले जात आहेत. अशीच घटना मिरा रोडमध्ये घडली आहे. मीरा रोड येथील एका सोसायटीमध्ये कुर्बानीसाठी 2 बकरे आणण्यात आले होते. सोसायटीमधील इतर लोकांना याची माहिती मिळाली तेव्हा गोंधळ घालण्यास सुरूवात झाली. यामुळे मीरा भाईंदर परिसरात तणावाचे वातावरण आहे. एका खासगी गृहनिर्माण वसाहतीमध्ये बकरी आणल्याच्या आरोपावरून पोलिसांनी 40 जणांविरुद्ध आयपीसीच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा -

  1. Ashadhi Ekadashi 2023: हिंदू मुस्लिम एकतेचा अनोखा प्रयोग, पोलिसांच्या आवाहनाला मुस्लिम बांधवांचा 100 टक्के प्रतिसाद, कुर्बानी न करण्याचा निर्णय
  2. Bakri Eid 2023 : भोपाळच्या किंग बोकडाला तब्बल इतक्या रुपयांची बोली; मुंबईच्या व्यक्तीने केले खरेदी
  3. Bakri Eid kurbani : बकरी-ईदला कुर्बानीसाठी बकरे आणल्याने मिरा रोडमधील सोसायटीत राडा, पोलिसात तक्रार दाखल

Last Updated : Jun 28, 2023, 8:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.