ETV Bharat / state

नाशिकच्या लष्करी जवानाचा जामनगर येथे अंगावर वीज पडून मृत्यू

author img

By

Published : Sep 7, 2019, 8:24 PM IST

मनमाड जवळील कर्ही गावातील या लष्करी जवानाचा कर्तव्य बजावत असताना अंगावर वीज पडून मृत्यू झाला. मल्हारी खंडेराव लहरे असे या जवानाचे नाव आहे. गुजरातच्या जामनगर येथील शस्त्रागारात ही घटना घडली.

मृत जवान मल्हारी खंडेराव लहरे

नाशिक - मनमाड जवळील कर्ही गावातील या लष्करी जवानाचा कर्तव्य बजावत असताना अंगावर वीज पडून मृत्यू झाला. मल्हारी खंडेराव लहरे असे या जवानाचे नाव आहे. गुजरातच्या जामनगर येथील शस्त्रागारात ही घटना घडली. मल्हारी यांचे निधन झाल्याचे समजताच कर्ही गावात शोककळा पसरली.

लष्करी जवानाचा कर्तव्य बजावत असताना अंगावर वीज पडून मृत्यू झाला
लष्करी जवानाचा कर्तव्य बजावत असताना अंगावर वीज पडून मृत्यू झाला

देश सेवेची आवड म्हणून मल्हार 2012 मध्ये लष्करात भरती झाले होते. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी कर्तव्य बजावले. सध्या त्यांची नियुक्ती गुजरातमधील जामनगर येथील एनडीआरटीच्या युनिटमध्ये झाली होती. शस्त्रगाराच्या सुरक्षेच्या बंदोबस्तासाठी उभे असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - मानखुर्दमध्ये घरगुती वादातून पतीने केली पत्नीची हत्या

चार वर्षांपूर्वी मल्हारी यांचे लग्न झाले होते. त्यांना दोन वर्षाचा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी फॅमिली कोर्टरमध्ये राहण्यास सुरवात केली होती.
त्यांचे पार्थिव आज (शनिवार) रात्री अकरा वाजता मूळगावी आणण्यात येणार आहे. रविवारी सकाळी दहा वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर कर्ही या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Intro:मनमाड येथील कर्ही गावातील लष्करी जवानाचा वीज पडून मृत्यू...

Body:मनमाड जवळील कर्ही गावातील मल्हारी खंडेराव लहरे या लष्करी जवानाचा कर्तव्य बजावत असतांना अंगावर वीज पडून मृत्यू झाला,गुजरातच्या जामनगर येथील शस्त्रगाराच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असतांना ही घटना घडली..मल्हारी यांचे निधन झाल्याचे वृत्त येताच कर्ही गावासह मनमाड आणि संपूर्ण नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे,

याबाबत अधिक माहिती अशी की ,मनमाड पासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्ही या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील मल्हारी लहरे यांचा जन्म झाला, देशसेवेची आवड म्हणून मल्हार 2012 मध्ये लष्करात भरती झाले, त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी कर्तव्य बजावले,

सध्या त्यांची नियुक्ती गुजरात राज्यातील जामनगर येथील एनडीआरटी च्या युनिटमध्ये झाली होती,येथे असलेल्या शस्त्रगाराच्या सुरक्षेच्या बंदोबस्त साठी एका उंच जागेवर कर्तव्य बजावत असतांना अचानक त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला,चार वर्षांपूर्वी मल्हारी यांचे लग्न झालं होतं,त्यांना दोन वर्षाचा मुलगा आहे,त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्नी आणि मुलगा आल्यावर रविवार पासून ते त्यांनी फॅमिली कोर्ट मध्ये राहण्यास सुरवात केली होती..लग्नानंतर पत्नी आणि मुलांसोबत पहिल्यांदाच युनिट मध्ये कॉटर भेटले होते ,कुटुंबासोबत फक्त पाचव्या दिवशी राहिल्यानंतर कर्तव्यावर असताना वीज पडून यांचा मल्हारी यांचा मृत्यू झाला,

त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच मनमाड आणि संपूर्ण नांदगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.त्यांचे पार्थिव आज रात्री अकरा वाजता मूळगावी आणण्यात येणार असल्याचं समजतंय,आणि उद्या सकाळी दहा वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर कर्ही या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.