ETV Bharat / state

जमिनीच्या वादातून वृद्धाची गळा चिरून हत्या; नाशिकमध्ये दीड महिन्यातील आठवा खून

वृध्दाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून नाशिक शहरात गेल्या दीड महिन्यातील ही आठवी खुनाची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नाशिक
नाशिक
author img

By

Published : Feb 18, 2021, 5:32 PM IST

Updated : Feb 18, 2021, 7:51 PM IST

नाशिक - शहरातील गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील आनंदवली गावात रमेश मंडलिक (वय ७५) या वृध्दाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून नाशिक शहरात गेल्या दीड महिन्यातील ही आठवी खुनाची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नाशिक

शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. कधी गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये दंगलीचा भडका उडतो तर कधी कौटुंबिक वादातून एखाद्याची हत्या होते. दोन दिवसांपूर्वी भाऊबंदकीच्या वादातून झालेल्या मारहाणीत शिंदे गावात सख्ख्या भावाला ठार मारल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेच्या तपासाला गती येत नाही, तोच बुधवारी (दि.१७) शहरातील गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील आनंदवली गावात रमेश मंडलिक या वृध्दाची गळा चिरून हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ श्वान पथकासह न्यायसहायक प्रयोगशाळेच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मंडलिक यांच्या मारेकऱ्यांच्या शोधात त्वरित गंगापूर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकासह गुन्हे शाखेच्या पथकाला रवाना करण्यात आले. मात्र, अद्याप आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

गुन्ह्यात राजकीय पदाधिकाऱ्यांचा सहभाग?

आनंदवली भागात झालेल्या वृद्ध व्यक्तीच्या खुनात सराईत गुन्हेगारासह पंचवटी भागातील क्रिकेट बेटिंगशी संबंधित असणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे बोलले जात होते. याआधी देखील जमिनीच्या वादातून मृत व्यक्तीच्या कुटुंबाचे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या नातेवाईकांचे वाद झाले होते.

दीड महिन्यात आठवा खून

नाशिक शहरात मागील दीड महिन्यात ही खुनाची आठवी घटना घडली आहे. पहिली घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती. यानंतर मुंबईनाका, गंगापुर, सरकारवाडा, भद्रकाली, अंबड, नाशिकरोड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सलग खुनाच्या घटना घडल्या. गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत दीड महिन्यांत हा दुसरा खुन आहे. यापुर्वीही आनंदवली शिवारात मद्यपी मित्रांमध्ये वाद होऊन एका मित्राने दुसऱ्याच्या डोक्यात दगड टाकून त्यास जागीच ठार केले होत

शहरात तडीपार गुन्हेगारांचा वावर

नाशिक मध्ये होत आलेल्या खुनाच्या आणि हनामारीच्या घटनांमध्ये तडीपार गुन्हेगारांचा सहभाग दिसून येत आहे.त्यामुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्याचे दिसत आहे.मात्र शहरात दाखल होणाऱ्या तडीपार गुन्हेगारांवर कलम 142 अंतर्गत कारवाई करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या गुन्हेगारांवर एमपीडी आणि मोक्का अंतर्गत कारवाई करत असल्याचे पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी सांगितले.

Last Updated : Feb 18, 2021, 7:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.