ETV Bharat / state

17 जूनपासून नाशिक जिल्ह्यात 'ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा'

author img

By

Published : Jun 16, 2021, 9:14 AM IST

राज्यातील पाच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाविरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील २७ महानगरपालिकेच्या एकूण २७३६ जागांमधून ७४० जागा कमी होत आहेत.

obc reservation
ओबीसी आरक्षण

नाशिक - ओबीसींचे राजकीय आरक्षण घटनात्मक अटींच्या पुर्ततेअभावी स्थगित करण्यात आले आहे. आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय समता परिषद सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा सामूहिक निर्णय घेण्यात आला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नाशिक जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत आज (बुधवारी) हा निर्णय घेण्यात आला. ही बैठक भुजबळ फार्म येथील कार्यालयात संपन्न झाली.

ओबीसीच्या जागा कमी होणार -

राज्यातील पाच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाविरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील २७ महानगरपालिकेच्या एकूण २७३६ जागांमधून ७४० जागा कमी होत आहेत. १२८ नगरपंचायती व २४१ नगरपालिकामधील ७४९३ जागांपैकी २०९९ जागा कमी होणार आहेत. ३४ जिल्हापरिषदेतील २००० जागांपैकी ५३५ जागा तर ३५१ पंचायत समितीमध्ये ४००० जागांपैकी १०२९ जागा कमी होणार आहेत. २७,७८२ ग्रामपंचायतींमध्ये अंदाजे १,९०,६९१ जागांपैकी ५१४८६ जागा ह्या ओबीसी समाजाच्या कमी होत आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचा कोणताही परिणाम हा नोकरी अथवा शैक्षणिक आरक्षणावर होणार नसला तरीही राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा परिणाम राज्यावरच नाही तर सर्व देशात होणार आहे. यामुळे आता सर्व ओबीसी संघटनांनी एकत्रित लढा देण्याची गरज आहे, असे असल्याचे मत विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - ..तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल; ओबीसींच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड नाही - भानुदास माळी

तसेच आरक्षणाच्या प्रश्नावर लोकांच्या मनात संभ्रम आहे. तो दूर करण्याचा प्रयत्न करून लोकांची जनजागृती करण्याची गरज आहे. त्यामुळे सर्व ओबीसी संघटना व समता परिषदेच्या प्रमुख कार्यकत्यांची गुरुवारी तालुकावार बैठक घेऊन जिल्ह्यात १५ दिवस करण्यात येणाऱ्या आंदोलनासंबंधी रुपरेषा तयार करण्यात यावी. यात सर्व ओबीसी संघटना व समता परिषदेच्या कार्यकत्यांनी एकत्र यावे व सरकारला आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी केले आहे.

यावेळी समता परिषदेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त करत ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करण्याची हाक दिली आहे. त्यानुसार उद्यापासून (शुक्रवारी, १७ जून) नाशिक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

यावेळी विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, जिल्हाध्यक्ष पश्मिम दिलीप खैरे, जिल्हाध्यक्ष पूर्व संतोष डोमे, शहर कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर, अंबादास खैरे, योगेश कमोद, चांदवड तालुकाध्यक्ष उत्तम आहेर, इगतपुरी तालुकाध्यक्ष शिवा काळे, रघुनाथ आहेर, नाशिक तालुकाध्यक्ष पांडुरंग काकड, धनंजय खैरनार, किरण भिवसने, सुनिल देवरे, यशवंत दळवी,आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.