ETV Bharat / state

37 नायलॉन मांजा विक्रेते तडीपार, नाशिक पोलिसांकडून सर्वांत मोठी कारवाई - Nylon Manja Case

Nylon Manja Case: जीवघेण्या नायलॉन मांजा विक्रीला बंदी असतानाही त्याची नाशिक शहरात छुप्या पद्धतीनं विक्री होत असल्याची बाब समोर आल्यानंतर नाशिक पोलीस अलर्ट झाले. (Nashik Police) नाशिक पोलिसांनी आतापर्यंत 37 नायलॉन मांजा विक्रेत्यांचा शोध घेतला त्यांच्या विरोधात एकाच वेळी तडीपारीची कारवाई केली आहे.

Nylon Manja Case
नायलॉन मांजा प्रकरण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 6:51 PM IST

नाशिक Nylon Manja Case: नायलॉन मांजामुळे नाशिक शहरात पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याच पार्श्वभूमीवर मकर संक्रातीला काही दिवस उरले असताना, पोलिसांनी तडीपारीची सर्वांत मोठी कारवाई केली आहे. (Tadipari Action) तसंच यापुढे पालकांनीही मुलांना नायलॉन मांजा वापर करण्यास प्रतिबंधक करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं. जर एखाद्या मुलाकडे नायलॉन मांजा आढळून आला तर त्यांच्या पालकांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. गेल्या सहा दिवसात पोलिसांनी सुमारे 20 लाख रुपयांचा नायलॉन मांजा पकडला असून संबंधित विक्रेत्यांना अटक केली आहे.

पालकांवर होणार कारवाई : नायलॉन मांजा विक्री आणि वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. यापुढेही नायलॉन मांजाद्वारे पतंग उडवण्यावर आणि त्यांच्या पालकांवरही कारवाई केली जाईल असं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितलं.

पोलीस ठाणे निहाय कारवाई : सरकारवाडा 8, आडगाव 3, पंचवटी 2, नाशिक रोड 2, देवळाली कॅम्प 1, इंदिरानगर 3, सातपूर 1, गंगापूर 5, भद्रकाली 5, म्हसरूळ 2 अशी नायलॉन मांजा वापरण्याची प्रकरणे नोंदविली गेली.

खंडपीठाचा महत्त्वपूर्ण आदेश : घर, मैदान, दुकान, खासगी मालमत्तेत मांजा सापडेल ते ठिकाण सील करावे. अल्पवयीन मुलांकडे नायलॉन मांजा कुठून आणला याची माहिती लपवली तर त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल करावा. घरावर पतंग उडवणाऱ्यांवर नजर ठेवावी तसेच त्यांच्यावर कारवाई संबंधित मालमत्ता धारकांना विचारून करावी, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ : नायलॉन मांजाचा वापर थांबविण्यासाठी शक्य होईल त्या पद्धतीनं प्रयत्न केले जात आहेत. नागपूर जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद तसंच महानगरपालिकेच्या चार हजार शाळांमध्ये 11 जानेवारी, 2023 रोजी नायलॅान मांजा न वापरण्याची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. जिल्हा प्रशासना मार्फत जिल्हास्तरावर नायलॅान मांजा विरोधी अभियान राबवण्यात येत आहे.

पालकांनाही आवाहन : मी पतंग उडविताना नायलॉन मांजा वापरणार नाही आणि इतर कोणालाही नायलॉन मांजा वापरू देणार नाही’, या आशयाची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी घेतली. यासोबतच पालकांनी आपला पाल्य पतंग उडवताना कोणता मांजा वापरतो आहे, याकडे लक्ष ठेवण्याचे आणि नायलॉन मांजा वापरल्यास कारवाई होऊ शकते अशी समज आपल्या पाल्यांना देण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे पालकांना करण्यात आलं.

हेही वाचा:

  1. पेपरफुटी काही थांबेना! महाज्योती पीएचडी परिक्षेचा पेपर फुटला; विद्यार्थी आक्रमक
  2. वंचितचा इंडिया आघाडीत अद्याप समावेश नाही, तरीही वंचित 'इंडिया'त येण्यासाठी आग्रही
  3. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचं वाचन सुरू, शिवसेनेची १९९९ साली नोंदलेली घटना नार्वेकरांनी मानली वैध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.